मुदखेड(प्रतिनिधी)-नवऱ्याच्या दारु पिऊन मारहाण करणाच्या त्रासाला कंटाळून पत्नीने नवऱ्याला ढकलले तो खाली पडला त्याच्या गळ्याला उपरणीने अडकून त्याचा जिव घेतल्याचा प्रकार नवी अबादी मुदखेड येथे घडला आहे. अगोदर या प्रकरणी आकस्मात मृत्यू दाखल झाला होता. तपासानंतर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. मुदखेड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी मारेकरी महिलेला तीन दिवस अर्थात 17 जुलै 2023 पर्यंत पोलीस अभिरक्षेत पाठविले आहे.
दि.5 जुलै रोजी नवी अबादी मुदखेड येथे मुदखेड येथे मारोती नामदेव वाघमारे (39) यांचा मृत्यू झाला. त्या दिवशी मुदखेड पोलीसांनी आकस्मात मृत्यू क्रमांक 24/2023 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कमल शिंदे यांनी केला. त्यांच्या समोर आलेल्या तपासानुसार मारोती वाघमारे अती दारु पिण्याच्या सवईचे होते. 5 जुलै रोजी सुध्दा त्यांनी भरपूर दारु प्राशन केली आणि पत्नी रुक्मीणीबाईला मारहाण केली. त्याच्या या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने त्याला घरातील अंगणात ढकलून दिले. मारोती वाघमारे खाली पडला आणि पत्नीने उपरणीने त्याच्या गळ्याला फास देवून त्याला मारून टाकल्याची माहिती समोर आल्यानंतर कमल शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुदखेड पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा क्रमांक 140/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक वसंत सप्रे हे करीत आहेत.
आज आपल्या नवऱ्याचा खून करणाऱ्या रुक्मीणीबाई मारोती वाघमारेला मुदखेड पोलीसांनी प्रथमवर्ग दंडाधिकारी न्यायालय मुदखेड येथे हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजुर करून महिलेला 17 जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नवऱ्याचा खून करणारी पत्नी पोलीस कोठडीत