दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु 

नांदेड, (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

 

तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी नंबर पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव एम.सी. फडके यांचा भ्रमणध्वनी 9421030710, सहा.सचिव ए.आर.कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिक साठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं. 8379072565, ए.सी.राठोड (क.लि) मो.नं. 8329471523 तर माध्यमिक साठी ए.पी. चवरे (व.अ)  मो.क्र. 9421765683 तर आर.ए. बिराजदार (क.लि) मो.क्र. 9892778841 हा भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक आहे. तर नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी 9371261500, बी.एम.कारखेडे मो.क्र.9860912898, पी.जी. सोळंके मो.क्र. 9860286857,  बी. एच. पाटील 9767722071 यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *