नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोर्टाच्या पाठीमागे 13 जुलैच्या रात्री दोन माणसांनी जबरी चोरी केली आहे.
मोहम्मद फैज मोहम्मद सईद(21) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 जुलै रोजी रात्री 11 वाजेच्यासुमारास ते आपल्या दुचाकीवर बसून जात असतांना कोर्टाच्या पाठीमागील रस्त्यावर त्यांना दुचाकी क्रमांक एम.एच.26 सी.एफ.2836 वर बसून आलेल्या दोन जणांनी त्यांची दुचाकी रोखून त्यांना खंजीरचा धाक दाखवून मोहम्मद फैज यांच्या खिशातील दोन हजार रुपये बळजबरीने काढून घेतले आहेत. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 281/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 341, 34 सोबत भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास वजिराबाद येथील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी