अवयवदानाचा प्रचार करणारी आगळी वेगळी लग्न पत्रिका

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका छापतांना एका युवकाने त्यात अवयवदान करण्याचे आवाहन केले आहे. या बाबीची दखल घेणे आवश्यकच आहे.
काल दि.17 जुलै रोजी बु.नारायण कोंडीबा कांबळे आणि बु.पुष्पबाई नारायण कांबळे यांची कन्या वैशाली हिचा विवाह लिंबगाव येथील अरुण वगर यांच्यासोबत पार पडला. या लग्नाच्या पत्रिका छापतांना आई-वडील नसतांना आपली जबाबदारी पुर्ण करणाऱ्या बाली नारायण कांबळे यांनी आपल्या आई-वडीलांच्या आशिर्वादानेच परिणय सोहळा साजरा होतोय असे वंदन केले. तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले यांच्या फोटोसह त्यांचा “शिक्षण कशाला म्हणतात.. जे खर आणि खोट ओळण्याची ताकत देेते ते शिक्षण असते’ हे वाक्य पत्रिकेवर छापले. तसेच मॉं साहेब जिजाऊ यांनी म्हटलेले वाक्य “जे सत्याला आणि असत्याला वेगळ करत त्याला शिक्षण म्हणतात.’ असे शब्द उल्लेखीत केले. तसेच तथागत गौतम बुध्द यांच्या शब्दांतील शिक्षण “सत्य आणि असत्याला वेगळ करून सत्याला छाती ठोकपणे स्विकारण्याची ज्यांच्यामध्ये ताकत असते त्याला शिक्षण म्हणतात’ असे शब्द उल्लेखीत केले.
सोबतच या पत्रिकेत मरावे परि अवयव रुपी उरावे.. अवयवदान श्रेष्ठ दान.. असे लिहुन अवयवदानासाठी लोकांना प्रेरित करतांना बाली कांबळे यांनी शब्द उल्लेखीत केले आहेत की, आजपर्यंत रक्तदान असो किंवा इतर दान अनेक प्रसंगी कार्यक्रमात केले. पण या मंगल परिणाच्या दिवशी काही वेगळे करावे अशी इच्छा झाल्याने मी अवयवदानासाठी लोकांना आवाहन करत आहे. सोबतच 200 गरजू व्यक्तींना द न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीच्यावतीने 1 लाख रुपयांचा अपघात विमा काढून देण्याचा संकल्प सुध्दा घेतला आहे. अशा प्रकारची ही आगळी वेगळी लग्न पत्रिका वाचकांसमोर सादर करतांना आपल्याला आपल्या जीवनात छोटी-छोटी कामे करून सुध्दा आनंद मिळतो हे दाखवायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *