नांदेड(प्रतिनिधी)-विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनात 18 व्या नांदेड पोलीस परिक्षेत्र पोलीस कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांची उपस्थिती होती. या कर्तव्य मेळाव्यात 17 जुलै ते 19 जुलै दरम्यान सांयटीफिक ऍन्ड एड टु इन्व्हेस्टीगेशन स्पर्धा, प्रवेश पत्र, पोलीस फोटोग्राफी स्पर्धा, व्हिडीओग्राफी स्पर्धा, संगणक जागृती स्पर्धा, श्वानपथक स्पर्धा, ऍण्टीसबोटेज चेकस् स्पर्धा, अकोमोडेशन प्लॅन अशा विविध स्पर्धा होणार आहेत.या स्पर्धेत नांदेड पोलीस परिक्षेत्रात नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या ठिकाणचे अनेक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या चार टिम सहभागी झाल्या आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला राज्यस्तरीय वर राष्ट्रीय पातळीवर पोलीस कर्तव्य मेळाव्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन