नांदेड(प्रतिनिधी)-21 पोलीस उपअधिक्षकांना नवीन पदस्थापना आणि तीन पोलीस निरिक्षकांना पदोन्नतीने पदस्थापना देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य गृहविभागाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांच्या स्वाक्षरीने आज निर्गमित करण्यात आले आहेत. नांदेड शहरातील इतवारा उपविभागात सुशिलकुमार नायक यांना पदस्थापना देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या गृहविभागातील अवर सचिव स्वप्नील बोरसे यांनी आज जारी केलेल्या आदेशानुसार पदस्थापनेच्या प्रतिक्षेतील सुशिलकुमार काशीबाराव नायक यांना इतवारा नांदेड उपविभागात पदस्थापना देण्यात आली आहे.भागवत सोनवणे यांना अपर पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे नियुक्त केले आहे. दिनेश परशुराम कदम यांना खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रातून अपर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे नियुक्ती दिली आहे. पदस्थापनेच्या प्रतिक्षेतील संजय रतन बांबळे यांना नाशिक ग्रामीण जिल्ह्यात कळवण उपविभागात नियुक्ती दिली आहे. तसेच निलेश विश्र्वासराव देशमुख यांना तुळजापुर उपविभागात नियुक्ती मिळाली आहे. सुभाष दत्तात्रय कोकाटे यांना अपर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग यांना कोकण विभागातील नवी मुंबई येथे नियुक्ती दिली आहे. आनंदा महादु वाघ यांना सहाय्यक पोलीस आयुक्त नाशीक शहर ही नियुक्ती मिळाली आहे. रविंद्र दगडू होवाळे यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर अशी नियुक्ती मिळाली आहे. युवराज मारोती मोहिते यांना पुणे ग्रामीण जिल्ह्यात पोलीस उपअधिक्षक मुख्यालय हे पद देण्यात आले आहे.
पुढील नवीन नियुक्त्या अशा आहेत ज्यांची नुतन नियुक्ती कंसात लिहिली आहे.सचिंद्र भाऊराव शिंदे-उपविभागीय पोलीस अधिकारी अजंनगाव सुर्जी,अमरावती ग्रामीण (उपविभागीय पोलीस अधिकारी चांदुर रेल्वे अमरावती ग्रामीण), अजयकुमार छगनलाल मालवीय-सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा नवी मुंबई (उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा जि.बुलढाणा), प्रकाश वसंत बेले-गंगापुर(सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), मृदुला रोहित दिघे-नागपुर (पोलीस उपअधिक्षक नागरी हक्क संरक्षण कोकण परिक्षेत्र ठाणे), विजय धोंडीबा भिसे-आमगाव, गोंदिया(सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), हेमंत नरहरी शिंदे-लोहमार्ग नागपुर(सहाय्यक पोलीस आयुक्त नागपुर शहर), योगेश नथुराम मोरे-सहाय्यक पोलीस आयुक्त नागपुर शहर (सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर), संजय शामराव पवार-पुलगाव(कळंब जि.यवतमाळ), नितीनकुमार निळकंठ गोकावे-मुख्यालय नाशिक ग्रामीण(मुख्यालय अहमदनगर), शेखर बसवेश्र्वर डोंबे-बृहन्मुुंबई(ठाणे शहर), संध्या बुधाजी गावडे-आर्थिक गुन्हे शाखा रत्नागिरी(सावंतवाडी), गौरीप्रसाद चंद्रशेखर हिरेमठ-लोहमार्ग मुंबई(उपविभागीय अधिकारी भुम).
तीन पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देवून पोलीस उपअधिक्षक पदावर नविन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.दिनेश मनोहर कत्ते-सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर, सुधाकर चंद्रभान सुरडकर-अपर पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई, शालीनी संजय शर्मा-सहाय्यक पोलीस आयुक्त नागपुर शहर.
इतवारा पोलीस उपविभागात सुशिलकुमार नायक; 21 पोलीस उपअधिक्षकांना नवीन पदस्थापना; तीन जणांना पदोन्नती