गोर बंजारा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारोह 23 जुलैला सांदिपनी शाळेत

नांदेड (प्रतिनिधी)-गोर सेना, गोर सिकवाडी चळवळीच्यावतीने अखिल भारतीय गोर बंजारा समाजाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा सांदीपनी पब्लीक स्कूल, चैतन्य नगर रोड, नांदेड येथे आयोजित केले आहे. गोर बंजारा विद्यार्थ्यांचे गुणगौरव समारोह नांदेड येथे दि. 23 जुलै 2023 रोज रविवार 11.00 वाजता आयोजन करण्यात आलेला आहे. नांदेड शहरातील शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये 10 वी, 12 वी मध्ये 75 टक्के गुण तसेच JEE, NEET, MHT-CET 50 % पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले तसेच UPSC, MPSC, NEET-SET, Ph.d. मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेले विद्यार्थी व स्पर्धात्मक परिक्षा विशेष प्राविण्य प्राप्त केलेले विद्यार्थीनी नाव नोंदणी करावी.

                      शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या सृजनशिल विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी वर्षभर घेतलेले परिश्रमातून घवघवीत यश प्राप्त केलेले असल्यामुळे त्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी गोर सीकवाडी चळवळीचे मुख्य प्रवर्तक स्व. मा. काशीनाथ नायक यांनी गोर बंजारा विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा म्हणून सन 2001 साली विद्यार्थी सत्काराची परंपरा चालू केली होती. हा स्तुत्य उपक्रम नांदेड शहरामध्ये सुरु करण्यासाठी त्यांनी खुप परिश्रम घेतले होते. त्यांच्या पश्चातही आज हा विद्यार्थी सत्कार गोर सीकवाडीच्या चळवळीच्या माध्यमाने सर्वदूर पसरलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्हाच्या ठिकाणी व तालुक्याच्या ठिकाणी गोर विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. स्व.मा. काशिनाथ नायक गेल्यानंतर सुध्दा गेल्या 20 वर्षापासूनची परंपरा चालू ठेवली आहे.
          या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील प्रा. प्रविण राठोड हे उपस्थित राहणार आहेत. विशेष सत्कारमुर्ती म्हणून NEET मध्ये 690 गुण प्राप्त केलेला ओम राठोड, 625 गुण, JEE मध्ये 99% persentile, MH-CET मध्ये 98.48 गुण घेऊन रितेश चव्हाण यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले व पार्थ चव्हाण 625 गुण घेतले आहे. PSI वैभव चव्हाण, PSI आडे अतुल व Researchar ISRO राज आडे अशा गुणवंताचा सत्कार करण्यात येत आहे.
       या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. हेमा नायक भूकिया, डॉ. प्रतिक राठोड, प्राचार्य डॉ. बबन पवार, मा. धरमसिंग चव्हाण, डॉ. प्रकाश चव्हाण, मा. सुनिल राठोड ( संचालक, संदीपानी पब्लीक स्कुल), डॉ. गोपाळ चव्हाण, डॉ. कृष्णा चव्हाण, डॉ. कृष्णा पवार, डॉ. भारती कृष्णा पवार, कु. मिनाक्षी पवार, मा. जी.आर. चव्हाण, डॉ. समय चव्हाण, डॉ. प्रा. विशाल जाधव (एम.डी.) आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
      तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त गोर बंजारा समाजातील विद्यार्थी व पालक उपस्थित रहावे असे आवाहन  प्रा. सुनिल राठोड सिडको, प्रा. निळू पवार, डॉ. राजेश चव्हाण, चरणसिंग राठोड वसमत यांनी गोर सिकवाडी चळवळीच्या वतीने केली आहे.
    विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करण्याचे ठिकाण :- डॉ. राजेश चव्हाण (मो.क्र.: 9423441237) यांचे चिंतामनी हॉस्पीटल, भावसार चौक, मालेगांव रोड, नांदेड येथे विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *