बोरगाव ता.देगलूर येथे घरे फोडून 2 लाख 55 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)-बोरगाव ता.देगलूर येथे एकापेक्षा जास्त घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.भोकर शिवारातून बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत.
बोरगाव ता.देगलूर येथील बाळासाहेब रामचंद्र बाबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 जुलैच्या रात्री 11 ते 18 जुलैच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांचे आणि साक्षीदारांचे घरफोडून चोरट्यांनी एकूण 2 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक श्रीमती पवार अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एटीएमजवळून निर्गुण दिगंबर शास्त्री यांची 50 हजार रुपयांची दुचाकी गाडी चोरीला गेली. तसेच ऋतूप्रभात किरण तेलंगे यांची 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी सरकारी दवाखाना विष्णुपूरी येथून चोरीला गेली आहे. हे दोन स्वतंत्र गुन्हे नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल केले आहेत.
गंगाधर नारायण मानेबोईनवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे नांदा शिवारातील महादेव पेट्रोल पंप येथील 16 हजार 480 रुपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *