नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै -ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परिक्षा आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा यांच्या वेळापत्रकामध्ये अतिवृष्टीच्या इशारामुळे बदल करण्यात आला आहे. अशी माहिती सचिव अनुराधा ओक यांनी जारी केली आहे.
18 जुलै 2023 ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(12वी) आणि 18 जुलै 2023 ते 1 ऑगस्ट 2023 या दरम्यान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता 10 वी) चे आयोजन परिक्षा मंडळाने संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे. परंतू 20 जुलै रोजी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. म्हणून 20 जुलै रोजीची परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
गुरूवार दि.20 जुलै 2023 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत होणारे 10 वी परिक्षेच्या तारखेत बदल करून बुधवार दि.2 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत घेतली जाणार आहे. गुरूवार दि.20 जुलै 2023 रोजी 12 वी परिक्षेचे 11 ते 2 या वेळेत असणारे पेपर शुक्रवार दि.11 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 2 होती. तसेच 20 जुलैचे दुपारी 3 ते 6 या वेळेदरम्यान सुनिश्चित असलेल्या परिक्षा 11 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेदरम्यान घेतल्या जाणार आहेत. उर्वरीत वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.