किनवट येथे पडलेला दरोडा जुगार अड्‌ड्यावर नव्हे तर मटनाच्या पार्टीवर

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे जुगार अड्‌ड्यावर दरोडा पडला नसून मटनाच्या पार्टीवर तो दरोडा होता असे आज पोलीस अभिलेखात लिहिलेले आहे. या दरोड्यात 2 लाख 3 हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविल्याचा गुन्हा किनवट पोलीसांनी दाखल केला आहे.
आरीफ अली इनायत अली भाटी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 जुलैच्या सायंकाळी 5 वाजता किनवट नगर पालिकेच्या डंम्पिंग ग्राऊंडजवळ सिरमेटी येथे किशन मुनेश्र्वर यांच्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये ते आणि इतर साक्षीदार मटनाची पार्टी करून जेवन करीत असतांना त्या ठिकाणी काही दरोडेखोर आले आणि तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख 25 हजार 500 रुपये, सोन्याच्या अंगठ्या आणि चैन 90 हजार रुपयांच्या आणि 87 हजार 500 रुपयांच पाच मोबाईल असा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. या तक्रारीवरुन किनवट पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 342, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 184/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक वाठोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
काल वास्तव न्युज लाईव्हला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार डम्पिंग ग्राऊंड जवळ 52 पत्यांचा जुगाराचा अड्डा सुरू होता आणि तो लुटला गेला होता. त्या लुटीमध्ये लुटीच्या ऐवजाची किंमत अनेकांनी वेगळी वेगळी सांगितली होती. तरी पण वास्तव न्युज लाईव्हने केलेल्या खात्रीनंतर ती लुट बहुतेक 28 लाखांची होती. बातमीत मात्र वास्तव न्युज लाईव्हने 15 लाख लिहिले होते. ही बातमी बातमी वास्तव न्युज लाईव्हनंतर अनेक प्रसार माध्यमांनी प्रसारीत केली होती. आजही काही वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी छापून आली. आता पोलीसांच्या अभिलेखात मटनाची पार्टी आहे तर मटनाची पार्टीच असेल. वास्तव न्युज लाईव्हने काल लिहिल्याप्रमाणे अशाच प्रकारच्या दोन प्रकरणांमध्ये मुखेड आणि नांदेड ग्रामीण पोलीसांनी लुटीचे गुन्हे दाखल केले होते आणि दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना अटकपण केली होती.

संबंधित बातमी…

https://vastavnewslive.com/2023/07/19/बंदुकीच्या-धाकावर-जुगार/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *