36 तासात पावसाने माजवला हाहाकार…

नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या 36 तासापासून पावसाने जिल्ह्याला झोडपले असून अनेक मध्यम धरणाचे प्रकल्प भरत चालले आहेत. पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पाण्यामुळे नदी-नाले भरून वाहत आहेत.शहरातील, गावातील नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे अनेक जागी नाले तुंबल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले असून अनेकांना त्याचा त्रास होत आहे. नांदेड जिल्ह्यातील सहशस्त्रकुंड धबधबा दुथडी भरून वाहत असल्याने निसर्गाचे सुंदर चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासन सुध्दा नागरीकांच्या अडचणींसाठी सज्ज आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सहस्त्रकुंड धबधबा..

जुन महिन्याच्या सुरूवातीला पावसाने दाखवलेली कमतरता काही दिवसांतच पुर्ण करून टाकली. कालपर्यंत पाणी कधी येणार, पाऊस कधी पडणार, पिकांचे काय होणार, कधी पेरणी करावी, दुबार पेरणी करावी लागेल अशा अनेक चिंतांनी ग्रस्त असलेले नागरीक आता 36 तासातच आता जास्त पाऊस झाला असे म्हणायला लागले आहेत. नदी नाल्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुध्दा भरपूर पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. गावांमध्ये आणि शहरामध्ये कमी उंचीवर घरे असणाऱ्या लोकांना पाणी तुंबल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पण प्रशासन सुध्दा अडीअडचणींसाठी तत्पर आहे.अनेक अडचणीतल्या लोकांना प्रशासनाने मदत करून सुरक्षीत ठिकाणी पोहचलवले आहे. प्रशासनासह नागरीकांनी सुध्दा या कामात मदत केली आहे.
आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुखेड तालुक्यातील पाळा, कोळनूर, होनवडज या गावांमध्ये काही घरात पाणी शिरले होते. तेथे जिल्हाधिकारी स्वत: लक्ष ठेवून आहेत. बिलोली तालुक्यातील हरनाळी, माचनूर, बिलोली, गोळेगाव, आरळी, कासराळी, बेळकोणी, कुंडलवाडी, गंजगाव येथे 1 हजार लोकांना सुरक्षीतस्थळी नेण्यात आले आहे. कोळी व भोई समाजाची मंडळी या कामात महत्वपूर्ण भुमिका बजावत आहे. गंजगाव येथील पुरात अडकलेले करण ऋशी, विशाल ऋशी, अर्जुन जाधव यांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे. तेथे नागरीक लक्ष्मण वनरवाड, पोट्टी वनरवाड, बस्वराज पाटील, संभाजी तोटलवार, साहेबराव घाटे, शेख अनवर यांनी मदत केल्याबद्दल प्रशासनाने त्यांचे धन्यवाद व्यक्त केले आहे. मौजे येसगी येथील मांजरा नदीला पुर आला नसून तेलंगणाकडे जाणारा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हैद्राबादकडे जाणारी आणि नांदेडकडे येणारी वाहतुक ठप्प पडली आहे. मुखेड तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव अतिवृष्टीने फुटला आहे. पाण्याचा विसर्ग हा संथगतीने आहे त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. प्रशासन खबरदारी घेत आहे.
बळेगाव बंधाऱ्यात 37.45 टक्के प्रकल्प भरला आहे. या बंधाऱ्यातून एक दरवाजा उघडलेला आहे. त्यातून 152.66 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. आमदुरा प्रकल्पातून एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. विष्णुपूरी प्रकल्पात पाण्याची पातळी 353.35 मिटर म्हणजे या प्रकल्पात पाण्याचा साठा 56.55 टक्के झाला आहे. 348 क्युमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग येथून सुरू आहे. 16 नंबरचा दरवाजा उघडण्यात आला आहे. ईस्लापूर धरणातून सुध्दा पाण्याचा साठा 57.4353 एवढा झाला आहे. या प्रकल्पात 65.19 टक्के साठा आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस पडत आहे. बळेगाव बंधाऱ्यात 4 मिटर उंच पाणी जमले आहे. बाभळी धरणाचे 14 दरवाजे उघडे आहेत. दिग्रस बंधाऱ्यात पाण्याचा साठा 19.65 घनमिटर आहे. 30.91 टक्के प्रकल्प भरला आहे. बळेगाव बंधाऱ्याचे दुपारी 12 वाजता दोन गेट उघडण्यात आले आहेत. विष्णुपूरी येथील दुसरा दरवाजा उघण्यात आला आहे. त्यातून 321 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.

नांदेड शहरात सुध्दा दैनंदिन जीवन विसकटले आहे.शहरात नाल्या तुंबल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासन प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे.विदर्भ आणि मराठवाड्याला वेगळ करणाऱ्या धनोडा जवळील पैनगंगा सुध्दा दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचे पाणी पुन्हा येण्याची शक्यता आहे. काही शेतकरी सांगतात आता पुन्हा एकदा दुबार पेरणी करावीच लागणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सहशस्त्रकुंड धबधबामात्र मोठ्या जोरदारपणे वाहत असल्याने त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. पण अति पाऊस झाला आहे हे सुध्दा तेवढचे खरे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *