
नांदेड(प्रतिनिधी)-मणीपुरमध्ये झालेल्या घटनेसंदर्भाने आणि भारतीय जनता पार्टीचे नेते किरट सोमया यांच्या संदर्भाने जिजाऊ ब्रिगेडने जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देवून ही घृणास्पद कामे करणाऱ्या लोकांवर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
आज जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरुणा अनिल जाधव यांच्या सहकारी सदस्या डॉ.विद्या पाटील, डॉ.कल्पना चव्हाण, अरुणा जाधव आणि कविता आगलावे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले. या निवेदनात मणीपुरमध्ये महिलेसोबत केलेल्या अत्याचाराचा उल्लेख करण्यात आलेला आहे. घटनेची माहिती व्हिडीओ व्हायरल झाल्यावर 77 दिवसांची मिळते हा मणीपुर सरकारचा नाकर्तेपणा आहे. मणीपुरमध्ये अशा किती महिलांवर अत्याचार झाला असेल याची कल्पना न केेलेली बरी. मणीपुर सरकारचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचेच आहेत आणि केंद्रात सुध्दा भारतीय जनता पार्टीचीच आहे. तरी पण माणुसकीला काळीमा फासणारे असे आरोपी मोकाट फिरत आहेत असे या निवेदनात लिहिले आहे.
महाराष्ट्रातील किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओचा उल्लेख सुध्दा या निवेदनात करण्यात आला आहे. मनाला लज्जा येईल असे कृत्य करतांना किरट सोमया या व्हिडीओमध्ये दिसतात. दोन्ही घटनांची सत्यता तपासणी करावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कार्यवाही करून माणुसकी, लोकशाही आजही जीवंत आहे हे दाखवावे असा उल्लेख निवेदनात आहे. लोकप्रतिनिधी, नेते मंडळी, यांचे वागणे, बोलणे सुसंकृत असावे, समाजाला दिशा देणारे असावे लागते. अश्लिल वागणे, अश्लिल व्हिडीओ माणुसकीला काळीमा फासणारे आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महिलांवर गलिच्छ आरोप करून बदनाम करण्याचे प्रकार वाढले आहेत. यात राज्य महिला आयोगाने सुध्दा आपली भुमिका स्पष्ट करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
