नांदेड(प्रतिनिधी)-विविध सहा संदर्भाच्या आधारे नुतन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी नव्याने एक आदेश जारी करून 50 टक्के उपस्थितीसह न्यायालयाचे कामकाज सुरू राहिल असे आदेश दिले आहेत. यामध्ये वकील संघटनेच्या कक्षात सुध्दा 50 टक्के उपस्थिती अनिर्वाय केली आहे. वकीलांनी दोन मास्क बांधायचे आहेत.

1 जुलैपासून नांदेडच्या प्रमुख व जिल्हा न्यायाधीशपदी एस.एल.आनेकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर 2 जून रोजी एक कार्यालयीन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार वेगवेगळ्या सहा संदर्भानुसार न्यायालयाचे कामकाज चालेल. वकीलांनी आपल्या बार रुममध्ये 50 टक्के बसण्याची सोय करावी. या बार रुमची उलट तपासणी सुध्दा होणार आहे. वकीलांनी आपल्या बार रुममध्ये दोन मास्क वापरायचे आहेत आणि कोविड नियमावलीनुसर वागायचे आहे. बार असोसिएशनने या कामाची पुर्ण दक्षतेने पालना होईल याची खबरदारी घ्यायची आहे. या कामामध्ये कांही त्रुटी असल्या तर वकीलांचे बार रुम बंद करण्याचा अधिकार जिल्ह्यातील संबंधीत न्यायालयाना राहिल. नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालय पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सुध्दा कामकाज करतील. आपल्या आवश्यकतेप्रमाणे नियमांमध्ये आवश्यकते फेरफार करता येतील असे या आदेशात लिहिले आहे.
