किरण मानेचे खून करणारे दोन्ही मारेकरी इतवारा पोलीसांच्या ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-17 जुलै रोजी रात्री किरण माने या युवकाचा खून करणारे दोन मारेकरी चार दिवसांनतर काल रात्री उशीरा इतवारा पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. इतवाराचे नुतन पोलीस उपअधिक्षक सुशीलकुमार नायक यांना इतवारा पोलीसांनी पहिल्याच दिवशी कामगिरी करून भेट दिली आहे.
18 जुलै रोजी चौफाळा भागातील पाण्याच्या टाकीखाली असलेल्या पत्राच्या शेडमध्ये किरण मानेला चाकूने भोकसून त्याचा खून शिवा माने आणि अविनाश नंदाने या दोघांनी केल्याची तक्रार किरणची पत्नी प्रतिभा यांनी दिली. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना काल रात्री उशीरा इतवाराचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक शेख असद, पोलीस अंमलदार अनिल गायकवाड आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. काल दि.21 जुलै रोजी इतवारा पोलीस उपविभागात पोलीस उपअधिक्षक सुशीलकुमार नायक रुजू झाले आहेत. इतवारा पोलीसांनी आपल्या पोलीस उपअधिक्षकांना खून प्रकरणातील दोन आरोपी त्यांच्या प्रथम कर्तव्याच्या दिवशी पकडून त्यांना भेट दिली आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी इतवारा पोलीसांचे कौतुक केले आहे.

संबंधित बातमी…

https://vastavnewslive.com/2023/07/18/जुन्या-प्रेम-प्रकरणाच्या/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *