अतिवृष्टीमुळे धनोडा – माहूर रस्ता बंद; जनतेने सतर्क राहावे

माहूर,(प्रतिनिधी)- माहूर आणि आसपासच्या परिसरात काल रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने माहूर,किनवट आणि सहस्त्रकुंड धबधबा आणि इतर पर्यटन क्षेत्रांना जनतेने पुढील दोन चार दिवस जाऊ नये असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने ट्विटरवर प्रसारित केली आहे.धनोदा ते किनवट कडे जाणाऱ्या पुलावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.माहूर जवळ टाकळी गावात पुरात अडकलेल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने पथके रावना केली आहेत.किनवट येथील मोमीनपुरा वस्तीत पाणीच पाणी झाले आहे.त्या ठिकाणच्या ८० लोकांना उर्दू शाळेत हलवण्यात आले आहे.

वास्तव न्यूज लाईव्ह सुद्धा जनतेला आवाहन करीत आहे की, आपला प्रवास पावसाचा अंदाज आणि माहिती घेऊनच निश्चित करावा आणि आपण सर्वानी सक्षम राहून गरजवंतांना मदत करूया.

 

;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *