
नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे पडलेला दरोडा हा जुगार अड्ड्यावर होता असे आरोपी सांगत आहेत म्हणून या प्रकरणाची सविस्तर चौकशी भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे हे करणार आहेत आणि तेथे जुगार अड्डा होता तर जुगार खेळणाऱ्यांवर सुध्दा कार्यवाही केली जाईल अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. 48 तास उसंत न घेता पोलीसांनी या आरोपींना जेरबंद केल्याची माहिती देतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी विशेष करून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांचे नाव घेतले. याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांची उपस्थिती होती.
18 जुलै रोजी किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॅम्पींग ग्राऊंडजवळ फिर्यादीप्रमाणे कंदोरी कार्यक्रमात दरोडा पडला. त्याबद्दल आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितले की, आरोपी पण सांगत आहे की, तेथे जुगार अड्डा चालतो तो आम्ही लुटायला गेलो होतो. कंदोरीच्या घटनेत लुट झाली असेल किंवा जुगार अड्ड्यावर लुट झाली असेल तरी तो गुन्हाच आहे. तेथे जुगार सुरू असेल याबाबतची चौकशी भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे हे करत आहेत आणि त्यांच्या चौकशीत असा घटनाक्रम जुगाराच्या अड्ड्याचा आला तर जुगार खेळणाऱ्यांवर सुध्दा कार्यवाही केली जाईल.
लुट करणारे एकूण 12 गुन्हेगार आम्ही पकडले आहेत त्यात एक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे त्या सर्वांनी आम्ही गुनहा केल्याचे कबुल केले आहे. माझ्या पोलीसांनी 48 तास क्षणाची उसंत न घेता मेहनत करून या 12 आरोपींना पकडले आहे. त्यात विशेष मेहनत म्हणून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांचे नाव घेतले. या चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरलेल्या 8 दुचाकी गाड्या, 2 अग्निशस्त्र व रोख रक्कम 1 लाख 25 हजार रुपये असा 5 लाख 95 हजार रुपयंाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांची रवानगी पुढील तपासासाठी किनवट पोलीस स्थानकाकडे करण्यात आली आहे. या गुन्ह्यात पकडण्यात आलेला विकास चंद्रकांत कांबळे हा तीन गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे आणि तो गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याला आज पहिल्यांदाच अटक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सय्यद इमरान सय्यद इसाक हा मिस्त्री आहे. तो किनवट भागात गोडाऊन बांधण्याचे काम करत आहे आणि त्यानेच हा दरोडा घडवलेला आहे.या गुन्ह्यात सुध्दा मकोका जोडला जाणार आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
या प्रकरणात पकडण्यात आलेले आरोपी पुढील प्रमाणे आहेत वैभव शिवराम गुरव (22) रा.व्यंकटेशनगर नांदेड, अंशुमनसिंघ राजेंद्रसिंघ मिलवाले (19) रा.गोविंदबागजवळ नांदेड, मुकेश उर्फ एमजेपी चंदन जोगदंड (22), प्रशिक उर्फ परशा उर्फ रॉणी दिलीप ओढणे (24), चंद्रशेखर उर्फ चंदू देवराव पाईकराव(24) रा.संघसेननगर नांदेड, ज्ञानेश्र्वर उर्फ डॅनी अनिरुध्द गाडगे(22) रा.सेनगाव ता.अर्धापूर, सय्यद सोयल सय्यद नुर(21), शेख मुबीन शेख गौस(21) रा.खुदबईनगर देगलूरनाका नांदेड, सय्यद इमरान सय्यद इसाक(27) रा.धनेगाव ह.मु.खडकपुरा नांदेड, सिताराम उत्तम काळे(26)रा.पळसा, विकास चंद्रकांत कांबळे (26) रा.पळसा ह.मु.धनेगाव नांदेड. या आरेापींमधील मुकेश जोगदंड, चंद्रशेखर पाईकराव, प्रशिक ओढणे,ज्ञानेश्र्वर गाडगे हे मुखेड येथील गुन्हा क्रमांक 171/2023 मध्ये सुध्दा सहभागी होते. तसेच
या प्रकरणी पोलीसांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांनी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, जी. पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, पोलीस अंमलदार माधव केंद्रे, गंगाधर कदम, मोतीराम पवार, गणेश धुमाळ, विलास कदम, रणधिर राजबन्सी, विठ्ठल शेळके, शंकर केंद्रे, उदय राठोड, सुरेश घुगे, संग्राम केंद्रे, संजीव जिंकलवाड, बालाजी तेलंग, किशन मुळे, सायबर सेलचे पोलीस उपनिरिक्षक गजानन दळवी, पोलीस अंमलदार राजू सिटीकर आणि दिपक ओढणे यांचे कौतुक केले आहे.
