नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून पाच दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांनी शेख सुफियान शेख शकील (18) रा.खुदबेनगर इतवारा, शेख अब्दुल रहेमान शेख चॉंद पाशा(18) रा.इतवारा आणि शेख आमेर शेख शब्बीर (18) रा.इतवारा या तिघांना ताब्यात घेवून माहिती घेतली असता त्यांनी चोरी गेलेल्या पाच दुचाकी गाड्या काढून दिल्या आहेत.या गाड्या शिवाजीनगर, पोलीस ठाणे पुर्णा, पोलीस ठाणे भाग्यनगर, पोलीस ठाणे मुदखेड आणि पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांच्या हद्दीतून चोरी केलेल्या आहेत. या तिघांना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने चोरीच्या पाच दुचाकी पकडल्या