नांदेड(प्रतिनिधी)-बालक मंदिर शिक्षण संस्था हनुमान टेकडी यांचे अध्यक्ष उमेश जालनेकर यांच्याविरुध्द न्यायालयात परक्राम्य संकीर्ण अभिलेख (निगोशियबल इंस्ट्रूमेंट ऍक्ट) आणि भारतीय संविधानाच्या कलम 420 नुसार 7 लाख 18 हजार 977 रुपये कर भरला नाही म्हणून खटला दाखल करण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 मध्ये बालक मंदिर शिक्षण संस्था हनुमान टेकडी आहे. या शाळेत बालकांना शिक्षण दिले जाते. त्या संस्थेकडे 7 लाख 18 हजार 977 रुपये थकबाकी झाली असतांना जप्तीची वेळ आली. म्हणून त्यावेळी संस्थेने 24 ऑक्टोबर 2022 रोजीचा 4 लाख 85 हजार 888 रुपयांचा धनादेश दिला होता. पण तो वटला नाही म्हणून त्यांना एनआयऍक्टच्या कलम 138 प्रमाणे नोटीस देण्यात आली. या प्रकरणात वसुली परिवेक्षक हरीपसिंघ सुखमनी यांनी दिलेल्या माहितीनंतर संस्थेचे अध्यक्ष उमेश मधुकर जालनेकर यांच्याविरुध्द महानगरपालिकेचे वकील ऍड.अनुप पांडे यांच्या मार्फत न्यायालयात दिवाणी दावा क्रमांक 111/2023 दाखल करण्यात आला. महानगरपालिकेचे कायदेशीर सल्लागार ऍड.बी.आर.भोसले यांनी बालक मंदिर संस्थेने मागितलेला वसुलीचा मनाई हुकूम रद्द केला आहे.
मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त संजय जाधव इतर गौतम कवडे, रमेश वाघमारे, अजहर अली. गिरीश काठीकर, गोपाळ चव्हाण पंडीत खुपसे आदींनी या प्रकरणाला पुढे आणले.
हनुमान टेकडी बालक मंदिर अध्यक्षाविरुध्द 7 लाख 19 हजारांचा कर वसुलीचा दिवाणी दावा दाखल केला