नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय कार्यक्रम आणि शासकीय पत्र व्यवहार यावर 350 वा शिवराज्याभिषेक या कार्यक्रमाचा लोगा वापरण्या संदर्भाचा शासन निर्णय 24 जुलै रोजी पर्यटन सांस्कृतीक कार्य विभाग या मंत्रालयाने जारी केला आहे. मंत्रालयाचे उपसचिव विलास थोरात यांची त्या शासन निर्णयावर डिजिटल स्वाक्षरी आहे.
350 वा शिवराज्याभिषके निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मना-मनात व्हावा, जगभरात जेथे मराठी माणुस आहे. तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तसेच याबद्दलची माहिती पोहचावी हा या मागील उद्देश आहे. त्यासाठी राज्य शासनाने 350 वा शिवराज्याभिषेक सोहळ्या संदर्भाने एक बोधचिन्ह तयार केले आहे. ते बोध्दचिन्ह सर्व शासकीय कार्यक्रमांचा प्रचार आणि प्रसिध्दी तसेच शासकीय पत्र व्यवहारांमध्ये कटाक्षाणे वापर करायचा आहे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात ते बोधचिन्ह चित्रीत करायचे आहे.सर्व मंत्रालयीन व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांना ही बाब निदर्शनास आणून देवून कटाक्षाने अंमलात आणण्यासाठी सुचना कराव्यात असे या शासन निर्णयामध्ये नमुद आहे.
“350 वा शिवराज्याभिषेक’ बोधचिन्ह आता शासकीय पत्र व्यवहारांवर आणि शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात झळकणार