सहाय्यक संचालक अडकला 60 हजारांच्या लाच मागणीत

नांदेड(प्रतिनिधी)-66 ग्राम पंचायतींचे लेखा परिक्षण करण्याचे काम दिल्याचा मोबदला म्हणून 70 हजार रुपयांची मागणी करून 60 हजार रुपयांची तडजोड करणाऱ्या सहाय्यक संचालक स्थानिक लेखा परिक्षा कार्यालयाविरुध्द लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक संचालकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेखा परिक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या संतोष हनमंतराव कंदेवार (45) सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालय नांदेड रा.कृष्णकुंज, पाटबंधारेनगर, तरोडा (बु) नांदेड हे वर्ग 1 चे अधिकारी आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे 13 जुलै रोजी तक्रारदाराने दिलेल्या अर्जानुसार सन 2021-22 चे 66 ग्राम पंचायतींचे लेखापरिक्षण करण्याचे काम देण्याचा मोबदला म्हणून 5 लाखांपर्यंतचा खर्च आहे. त्यासाठी 1 हजार, ज्या ग्राम पंचायतींचा खर्च 10 लाखांपर्यंत आहे. त्याचे 2 हजार आणि 10 लाखांपेक्षा जास्त खर्च आहे अशा ग्रामपंचायतींचे प्रति 10 हजार असे एकूण 70 हजार रुपये लाच म्हणून मागले आहेत याची खात्री झाल्यानंतर त्या तक्रारदाराने तक्रार दिली.13 जुलै रोजीच या लाच मागणीची पडताळणी झाली. पडताळणीदरम्यान टोटल 70 हजार करून टाक असे संतोष कंदेवार म्हणाला, तेंव्हा काही कमी करण्याची विनंती झाली तेंव्हा दोन पंचासमक्ष 60 हजार रुपयांमध्ये लाचेची तडजोड झाली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हा लाच मागणीचा गुन्हा काल दि.25 जुलै रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. सोबतच स्थानिक लेखा परिक्षा निधी कार्यालयाचे सहाय्यक संचालक संतोष हनमंतराव कंदेवार यास अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक गजानन बोडके, पोलीस अंमलदार राजेश राठोड, गजानन राऊत, ईश्र्वर जाधव, सय्यद खदीर, मारोती सोनटक्के, प्रकाश मामुलवार आदींनी ही कार्यवाही केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 यावर आणि पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल. जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *