नांदेड(प्रतिनिधी)-तालुका कृषी अधिकाऱ्याचा बंधू विकत होता बनावट किटक नाशक औषध.तामसा पोलीस ठाण्यात या प्रकरणी फसवणूक आणि कॉपीराईट कायदा या प्रमाणे तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शादाब कुरेशी जाकीर कुरेशी हे टु बडी कंस्लटंन्सी प्रा.लि.कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक आहेत. ते सीजेेंडा इंडिया प्रा.लि.या कंपनीसाठी काम करतात. त्यांना माहिती मिळाली की, किमया कृषी सेवा केंद्र कोळगाव ता.हदगाव जि.नांदेड येथे चंद्रकांत वारकड नावाचा व्यक्ती शेतकऱ्यांना बनावड किटकनाशक औषधी विक्री करत आहे. त्याबद्दल आम्ही कार्यवाही करण्यासाठी नांदेडला आलो आणि पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेवून मदत मागितली. त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना आमच्यासोबत कर्मचारी पाठविण्यास सांगितले. त्यावेळी पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संजय केंद्रे, पोलीस अंमलदार शंकर मैसनवाड आणि शंकर केंद्रे यांना आमच्यासोबत पाठविले. आम्ही पोलीस ठाणे तामसा येथे जावून तेथून पोलीस उपनिरिक्षक चांदु सरोदे आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुनिल सुर्यवंशी यांना सोबत घेवून कोळगावला गेलो. त्या दुकानाचे मालक कामाजी नबाजी हुंडेकर (32) हे आहेत. तेथे विरटाको नावाचे बनावट किट नाशक औषध विक्री केले जात होते. एकूण 78 हजार 400 रुपयांचा बनावट साठा जप्त करण्यात आला आणि चंद्रकांत सुभाष वारकड (32), माणिक प्रभाकर पवार (28) आणि दुकान मालक कामाजी नबाजी हुंडेकर यांच्यासह बनावट किटक नाशक साठा पोलीस ठाणे तामसा यांच्या स्वाधीन केला. या तक्रारीनुसार तामसा पोलीसांनी तिघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि कॉपी राईट कायदा कलम 63, 65, 103 आणि 104 नुसार गुन्हा क्रमांक 65/2023 दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पथकाने श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्र येथेही कार्यवाही केली.या प्रकरणातील एका आरोपीचे बंधू माहुर येथे तालुका कृषी अधिकारी आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे.
तालुका कृषी अधिकाऱ्याचा बंधूच विकतो बनावट किटक नाशक