नांदेड(प्रतिनिधी)-कालपासून पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. आज सकाळपासून व्यवसायीक एकटेच आपल्या दुकानात बसलेेले आहेत. रस्त्यावरुन वाहणारी वाहतुक सुध्दा नगण्य झाली आहे. गावखेड्यांमध्ये नदी नाले भरून वाहत आहेत. अनेक गावांना जोडणारे नदी-नाले भरून वाहत असल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलेला आहे.
जिल्ह्यात गुरुवार 27 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 468.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात गुरुवार 27 जुलै 2023 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 15.40 (348), बिलोली-40.30 (575.90), मुखेड- 19.10 (484.50), कंधार-9.90 (233.70), लोहा-11.90 (329), हदगाव-25.30 (431.70), भोकर-57.90 (534.80), देगलूर-25.30(488.40), किनवट-78.30(693.70), मुदखेड- 28.60 (441.90), हिमायतनगर-43.30 (422.80), माहूर- 21.50 (705.60), धर्माबाद- 39.60 (537.90), उमरी- 34.50 (511.50), अर्धापूर- 25.90 (439.60), नायगाव-23 (376) मिलीमीटर आहे.