नांदेड (प्रतिनिधी) – पावसाच्या माजविलेल्या हाहाकारानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी २८ जुलै रोजी प्राथमिक, माध्यमिक शाळा यांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसाठी शाळा सोमवारीच उघडेल.
जिल्ह्यामध्ये मागील ३६ तासापासून अतिवृष्टी होत आहे. या संदर्भाने नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे गुरूवारी दि. २७ जुलै रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार शुक्रवार दि. २८ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता दहावी आणि १२ वीच्या बोर्ड परिक्षा व शासकीय वाणिज्य प्रम ाणपत्र परिक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.