नांदेड(प्रतिनिधी)-आपली पत्नी माहेरला का नेऊन सोडली. या रागातून एका कुपूत्राने आपले आई-वडील आणि भाऊ मरावे म्हणून पिण्याच्या पाण्यात विषारी औषध टाकून पळून गेला आहे. लिंबगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दिगंबर शंकरराव बोकारे (55) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा माधव दिगंबर बोकारे (30) रा.राहाटी ता.जि.नांदेड याची पत्नी वडीलांनीच स्वत: तिच्या माहेरी नेऊन सोडली होती. कारण माधव बोकारे दारु जास्त पित होता म्हणून. हे त्याचे कारण आहे. यानंतर माधव आणि त्याचे वडील दिगंबर, आई आणि भाऊ यांच्यामध्ये पत्नीला परत आणण्यासाठी माधव नेहमी वाद करत असे. परंतू आई-वडीलांनी तु दारु पिणे सोडला तरच तुझ्या पत्नीला परत आणू अशी ठाम भुमिका घेतली होती. याचा राग मनात धरुन 25 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास त्याने घरातील पिण्याच्या पाण्यात विषारी औषध टाकले आणि घरातून निघून गेला. त्याचा उद्देश आई-वडील आणि भाऊ मरावेत हाच आहे.
त्यानंतर ते पाणी पिलेल्या माधवचे आई-वडील आणि भाऊ यांना उलट्या होवू लागल्या. प्राप्त माहितीनुसार काही वेळाने माधवने फोन करून पाण्यात विषारी औषध टाकल्याची माहिती घरच्यांना दिली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आपलाच मुलगा आपल्या जीवावर उठला या दु:खामुळे तक्रार देण्यास उशीर झाला. ही तक्रार 27 जुलै रोजी सायंकाळी दाखल करण्यात आली. ज्यामध्ये आरोपी या सदरात दिगंबर शंकरराव बोकारे यांचा मुलगा माधव दिगंबर बोकारे (30) याचे नाव आहे. लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक कोडींबा केजकर अधिक तपास करीत आहेत.
दारुच्या नशेत कुपूत्राचा आई-वडील आणि भावाला पाण्यात विष टाकून मारण्याचा प्रयत्न