नांदेड(प्रतिनिधी) येथील टायगर ऍटो सेनेचे शेख अहेमद (बाबा) बागवाले यांची जयसंघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेत मराठवाडा प्रवक्ता प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. जयसंघर्षचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय माणिकराव हाळनोर यांनी ही नियुक्ती केली आहे.
नांदेड येथील शेख अहेमद (बाबा) बागवाले हे नांदेड येथे टायगर ऍटो सेनेचे प्रमुख आहेत. जयसंघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष संजय हाळनोर यांनी शेख अहेमद यांची मराठवाडा प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती एका वर्षासाठी आहे.
बाबा बागवाले यांची जयसंघर्ष या संघटनेच्या प्रवक्तेपदी नेमणूक