नांदेड(प्रतिनिधी)- भोकर पोलीसांनी तीन बैल जातीचे जनावरे पकडून दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने पायी वाहतुक केली जात होती.
पोलीस अंमलदार लहु प्रल्हाद राठोड हे 28 जुलै रोजी सकाळी सुधा नदीजवळ गस्त करत असतांना त्यांना तीन बैल पायी वाहतुक होत असतांना दिसले. त्यांनी विचारणा केली असता त्यांना उत्तर देता आले नाही. तेंव्हा लहु प्रल्हाद राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुरेश रघुनाथ डोंगरे (40) रा.आष्टी ता.हदगाव आणि महेमुद जलाल साब कुरेशी (56) रा.साईनगर भोकर ह्या दोघांनी कत्तल करण्याच्या उद्देशाने 50 हजार रुपये किंमतीची तीन बैल जातीची जनावरे पायी वाहतुक करतांना सापडली आहेत. त्यांच्याविरुध्द प्राणी संरक्षण अधिनियम 1995 च्या कलम 5, 5(अ), 5(ब), 9(अ) प्रमाणे गुन्हा क्रमांक 265/2023 दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
भोकर पोलीसांनी तीन बैल जातीची जनावरे पकडली ; दोघांवर गुन्हा दाखल