नांदेड(प्रतिनिधी)-कचऱ्या वेचने कोणासाठी उर्दनिर्वाहचे साधन आहे तर कचरा वेचणे ही कोणासाठी बेइज्जती आहे आणि याच वादातून झालेल्या मारहाणी दरम्यान एका 35 वर्षीय व्यक्तीने 40 वर्षीय व्यक्तीचा खून केला. घटनाक्रम अंबानगर सांगवी येथे घडला.
दोन मित्र बाळू उर्फ प्रमोद कांबळे (35) रा.अंबानगर आणि संदीप रघुनाथराव चौदंते (40) रा.अंबानगर असे चौदंते यांच्या घरासमोर बसून गप्पा मारत होते. त्यामध्ये बाळू कांबळेने संदीप चौदंतेला सांगितले की, तु कचरा गोळा करण्याचे काम करत जाऊ नको. त्यावर संदीपने उत्तर दिले, माझा आणि माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह या कचरा गोळा करण्याच्या कामावरच चालतो आणि त्यातून हा वाद पुढे गेला तेंव्हा अगोदर बाचा-बाची झाली आणि त्यानंतर बाळू कांबळेने काठी, पायावर, डोक्यावर मारुन त्याला जखमी करून त्यांचा खून केला.
या बाबतची तक्रार संतोष रघुनाथराव चौदंते यांनी दिली आणि बाळु उर्फ प्रमोद कांबळे विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 323 आणि 504 प्रमाणे विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 255/2023 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनात सहायय्क पोलीस निरिक्षक शिवाजी देवकत्ते हे करीत आहेत. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार विमानतळ पोलीसांनी मारेकरी प्रमोद उर्फ बंडू कांबळेला ताब्यात घेतले आहे.
कचरा वेचण्याच्या कारणावरून खून ; मारेकरी विमानतळ पोलीसांच्या ताब्यात