पोलीस खेळाडूंना आता एक टप्पा पदोन्नती मिळण्यासाठी नवीन प्रस्ताव

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलातील खेळाडूंना एक टप्पा पदोन्नती देण्यासाठी आता नवीन प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यापुर्वी पोलीस खेळाडूंना मिळणाऱ्या एक टप्पा पदोन्नतीसाठी असलेले सर्व परिपत्रक रद्द करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पोलीस दलात जिल्हा क्रिडा स्पर्धा होतात. विभागीय क्रिडा स्पर्धा होतात. राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा होतात आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर पोलीस खेळाडूंना संधी मिळते. जे पोलीस खेळाडू, पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार पदाचे आहेत त्यांना त्यांच्या उत्कृष्ट क्रिडा कामगिरीनंतर एक टप्पा पदोन्नती देण्यासाठी सन 2004, 2007, 2008, 2008,2008 आणि 2013 मध्ये विविध परिपत्रके आणि त्यातील आशयाच्या अनुषंगाने पोलीस क्रिडा स्पर्धेतील लोकांना एक टप्पा पदोन्नती मिळत असे त्यासाठी विविध क्रिडा स्पर्धा, अखिल भारतीय पोलीस क्रिडा नियंत्रण मंडळ नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये वैयक्तीक व सांगीक विजय संपादन करणाऱ्यांना एक टप्पा पदोन्नती दिली जात असे.
पोलीस महासंचालक कार्यालयातील अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) संजीवकुमार सिंघल यांनी 30 जून 2021 रोजी जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडूंनी राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध क्रिडा स्पर्धा आणि अखिल भारतीय पोलीस क्रिडा नियंत्रण मंडळ नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या क्रिडा स्पर्धामध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना (पोलीस शिपाई ते पोलीस निरिक्षक पदापर्यंत) एक टप्पा पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *