5 सेंटीमिटर मुठ आणि 30 सेंटीमिटर पाते असलेली मोठी तलवार इतवारा पोलीस ठाण्यातील मातब्बर अंमलदाराने पकडली

नांदेड (प्रतिनिधी)-इतवाराच्या एका दक्ष पोलीस अंमलदाराने 5 सेंटीमिटर लांबीची मुठ आणि 30 सेंटीमिटरचे पाते असलेली तलवार शोधली आणि एका युवकाला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला पोलीस कोठडीत टाकले.
इतवारा पोलीस ठाण्यात एक विद्वान पोलीस अंमलदार आहेत.ज्यांनी अगोदर स्थानिक गुन्हा शाखेत सुध्दा काम केलेले आहे. त्यांचे शुभ नाव एकनाथ सखाराम मोकले बकल नंबर 436 आहे. त्यांनी एक मोठी कार्यवाही करत मोठी तलवार पकडली. त्यांनी दिलेल्या तक्ररीनुसार 29 जुलैच्या रात्री 11.05 वाजता त्यांना इदगाह कमान परिसरात एक व्यक्ती शस्त्र बाळगुण आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली. तेथे जाऊन त्यांनी त्या युवकाला पकडले. त्याचे नाव शेख बबलू शेख कलीम (22) रा.महेबुबीया कॉलनी, देगलूरनाका नांदेड असे आहे. त्याच्या ताब्यात एक तलवार होती म्हणे. त्या तलवारीचे वर्णन असे लिहिले आहे की, तलवारीची मुठ 5 सेंटीमिटर आणि मुठीपासून पात्याच्या टोकापर्यंत 30 सेंटीमिटर अशी लोखंडी तलवार होती म्हणे. 5 सेंटीमिटरची मुठ असेल तर तो युवक त्या तलवारीला आपल्या मुठीत कसा धरेल असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे आणि त्याची किंमत 500 रुपये आहे. यामुळे त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे या विद्वान पोलीस अंमलदाराने तक्रार दिली. एकनाथ मोकले हे पोलीस अंमलदार ईतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन शेख बबलुविरुध्द गुन्हा क्रमांक 229/2023 दाखल झाला. आज दि.30 जुलै रोजी न्यायालयाने बबलुला जामीन दिल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
न्यायालयात बबलु रडत होता. मी नुसता ईदगाह कमानीजवळ उभा होतो असे म्हणत होता. आतात्याच्या रडण्यावर न्यायालयात काही महत्व नसते. परंतू 5 सेंटीमिटरची मुट आणि 30 सेंटीमिटरचे पाते असलेली तलवार याचा पंचनामा तर न्यायालयाने पाहिलाच असेल ना. यावरुन न्यायालयाला काय कळायला हवे ते नक्कीच कळले असणार अशी ही कथा विद्वान पोलीस अंमलदाराची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *