नांदेड(प्रतिनिधी)-चोरट्यांनी एका व्यक्तीचा पाठलाग करून श्रीनगरमधील विश्र्व इंव्हेस्टमेंटच्या समोर गाडी उभी करून तो व्यक्ती आत गेल्यावर ती गाडी पुढे नेली आणि गाडीतील 2 लाख 60 हजारांची बॅग घेवून पळून गेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
आज दुपारी 2 वाजता कैलास भारसावडे हे विश्र्व इंव्हेस्टमेंट, स्विस बेकरीच्या मागे श्रीनगर येथे आले. त्यांनी आपली पांढरी स्कुटी तेथे लावली. पण तिला हॅंडल लॉक गेले नाही आणि ते विश्र्व इंव्हेस्टमेंटमध्ये गेले. त्यांच्या मागून एक पांढऱ्या रंगाचा शर्ट घालेला ज्याच्या डोक्यावर टोपी आहे आणि हातात छत्री आहे आणि दुसरा चॉकलेटी शर्ट घातलेला व्यक्ती एका दुचाकीवर आले आणि त्यांनी ती दुचाकी स्कुटीपेक्षा 200 फुट मागे उभी केली. त्यातील टोपी घातलेल्या माणुस पहिले पुढे आला आणि त्याने ती भारसावडेची पांढरी स्कुटी पुढे नेली आणि काही क्षणातच ते दोघे पळत परत आले आणि आपल्या दुचाकीवर बसून त्यांनी पोबारा केला. या चोरट्यांनी भारसावडेच्या स्कुटीच्या डीकीमधील 2 लाख 60 हजार रुपये पळवले आहेत. कैलास भारसावडे सध्या पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे आहेत. पोलीसांची त्यांची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून घेत आहेत.
भरदुपारी 2 लाख 60 हजारांची चोरी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद