नांदेड(प्रतिनिधी)-काही जणांनी मनात काळेबेरे ठेवून धनंजय सोळंकेचा गेम केला होता. पण धनंजयने आपल्या मेहनतीवर विश्र्वास ठेवला आणि आता तो मॅक्स महाराष्ट्र या चॅनलमध्ये आता मराठवाडा ब्युरो चिफ या पदावर नियुक्त झाला आहे. वास्तव न्युज लाईव्ह धनंजय सोळंकेचे अभिनंदन करत आहे.
काही महिन्यांपुर्वी मनात नेहमी मोदकांची आशा ठेवणाऱ्या काही चॅनल प्रतिनिधींनी एका काकाच्या मुलाची नियुक्ती व्हावी म्हणून धनंजय सोळंकेचा गेम केला होता. त्यामुळे त्या चॅनलने धनंजय सोळंकेला आपल्या चॅनलमधून बाहेर काढले होते. आपल्या सोबत झालेल्या छुप्या हल्याला अत्यंत गांभीर्याने घेत धनंजय सोळंकेने आपली मेहनत आपल्याला परत चांगले पद देईल या आशेवर पुराच्या पाण्यात पोहणे शिकले आणि त्याचा परिणाम पण आला. मुंबईच्या मॅक्स महाराष्ट्र मिडीया सोलुशनमध्ये मॅक्स महाराष्ट्र या चॅनलने त्या धनंजय सोळंकेला आता मराठवाडा ब्युरो चिफ पदावर नियुक्ती दिली आहे. मॅक्स महाराष्ट्र सोलुशनने विभागीय उपसंचालक माहिती विभाग छत्रपती संभाजीनगर यांना सुध्दा एक पत्र दिले आहे. ज्यामध्ये शासकीय वृत्त संकलनासाठी उपसंचालक कार्यालयाच्या स्तरावर धनंजय प्रल्हादराव सोळंके यास सहकार्य करण्यास सांगितले आहे.
आपल्या जीवनात होणाऱ्या घडामोडी या रस्त्यासारख्या आहेत. रस्त्यावर आलेल्या वळणाप्रमाणे आपल्या सुध्दा वळून प्रवास करावा लागतो कारण आपल्याला वळण सरळ करता येत नाही. अशाच प्रकारे आपल्या जीवनात आलेल्या एका वळणाच्या रस्त्यावर वळणाप्रमाणे वळून धनंजय सोळंकेने पहिल्यापेक्षा जास्त मोठे पद मिळवून पोट दु:खी असणाऱ्यांना दाखवून दिले आहे की, मेहनतीच्या बळावर आपण आपले ध्येय साध्य करू शकतो.
