नांदेड(प्रतिनिधी)-हिप्परगा थडी ता.बिलोली येथील मारोती मंदिरातील दान पेटी फोडतांना एक चोरटा दिसला. गावातील लोकांनी पाहिल्यानंतर चोरटा पळून गेला. दान पेटीतील 25 हजार रुपये गायब झाले आहेत.
हिप्परगा थडी येथील मारोती मंदिराचे पुजारी गुरूलिंग बसलिंगअप्पा मठवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्यासुमारास गावातील हनुमान मंदिरातून काही आवाज येत असल्याने गावातील काशिनाथ शंकरअप्पा मठवाले, हनुमंत नागनाथ सजगरे, मारोतीलाल अप्पा भुरे हे तिघे मंदिरात गेले. त्यावेळी आबाभोई नागाभोई अंकेश्वर रा.हिप्परगा थडी हा मंदिराची दानपेटी दगडाने फोडत होता आणि त्यातून पैसे काढून घेत होता.तिघांनी चोरट्यांना पाहिल्यानंतर तो पळून गेला. बिलोली पोलीसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार आंबेवार अधिक तपास करीत आहेत.
मारोती मंदिर फोडले ; 25 हजार रुपये चोरले