नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वातावरण अतिशय खराब आहे असा संदेश आपल्या सर्व अधिकारी आणि अंमलदारांना देतांना पोलीस निरिक्षक अशोकराव घोरबांड यांनी कोणीही गैर काम करणार नाही याची नोंद घेण्यास सांगितले आहे.
तात्पुरत्या स्वरुपात वजिराबाद पोलीस ठाण्याचा कारभार देण्यात आल्यानंतर पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड अत्यंत कर्तव्यदक्ष पध्दतीने सर्व कामे करीत आहेत. पण आज सकाळी 9.55 वाजता त्यांनी टाकलेला संदेश वातावरण अतिशय खराब आहे हे वाक्य बुचकळ्यात टाकणारे आहे. कशा पध्दतीने वातावरण खराब आहे. ज्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर ते व्हॉटसऍप गु्रपवर मिळते काय असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. व्हॉटसऍप गु्रपवर चर्चा करूनच वातावरण निवळणार असेल तर पोलीस स्टेशनची गरज काय असाही प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. या शब्दांमध्ये वातावरण कोणते खराब आहे हे मात्र काही लिहिलेले नाही. त्यांनी आल्यानंतर मोदकांमध्ये झालेली वाढ हे कारण आहे की अजून काही. अघटीत घटना होणार आहे याचा बोध यावाक्यातून होत नाही.
बदली झालेले पोलीस अंमलदार सर्वच एकाच दिवशी सोडले मात्र एक राखुन ठेवला
काल दि.4 ऑगस्ट रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यातून इतरत्र बदली झालेले सर्व पोलीस अंमलदार एकदाच सोडून देण्याचे आदेश पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी दिले आहे. त्यानुसार बदली झालेले सर्व पोलीस अंमलदार आप-आपल्या नवीन ठिकाणी जाण्यासाठी वजिराबाद पोलीस स्टेशनला सायोनारा करून निघाले आहेत. पण यात एक सरबजितसिंघ पुसरी नावाचा पोलीस अंमलदार मात्र सोडलेला नाही. सरबजितसिंघ पुसरीवर आता पुर्ण पोलीस ठाणे चालणार आहे काय? असा प्रश्न बदलीवर सोडलेले पोलीस अंमलदार बोलत आहेत. सरबजितसिंध पुसरी हे अशोकराव घोरबांड यांचे अंगरक्षक आहेत. बहुदा त्यांच्यासारखे अंगरक्षकाचे काम दुसऱ्या पोलीसाला येत नसेल म्हणून पुसरीला सोडण्यात आले नसेल अशी चर्चा सुरू झाली आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्याचे वातावरण अतिशय खराब-इति श्री.अशोकराव घोरबांड