नांदेड(प्रतिनिधी)-काम पत्रकारीतेचे आणि धंदा सेटलमेंटचा असा काही प्रकार जिल्हा परिषदे कार्यालयात वावरतांना हे आपले घरच आहे असे समजणाऱ्या पत्रकारांनी सुरू केला आहे.
जिल्हा परिषदेच्या मागील मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी काही पत्रकारांना जिल्हा परिषदेमध्ये गुत्तेदार बनवले. त्यामुळे वर्षा घुगे यांच्या बातम्या छापून येत होत्या आणि त्यांना सुध्दा तेच हवे होते. सध्या प्रशासक व्यवस्था असल्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्याचा काही एक दखल जिल्हा परिषदेमध्ये नाही आणि सर्व काही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हातात आहे. काही पत्रकारांनी बांधकाम क्षेत्रात गुत्तेदारी केली. काहीनी जनजागृतीच्या गाड्या लावल्या. त्यांच्याकडे या संबंधाचे परवाने आहेत की नाही याची माहिती मात्र मिळाली नाही. जिल्हा परिषदेमध्ये पाय न ठेवणाऱ्या कोण्या पत्रकाराने एखाद्या अधिकाऱ्याविरुध्द बातमी लिहिली तर त्याची सेटलमेंट करण्याची जबाबदारी गुत्तेदार/पत्रकार घेत आहेत. त्यांना किती यश आले हा विषय महत्वाचा नाही. पण कोणी पत्रकाराने एखादी बातमी लिहिली तर त्या बातमीबद्दल खुलासा करण्याचा किंवा त्याची सेटलमेंट करण्याचा अधिकार इतर पत्रकारांना नसतो. आणि जे पत्रकार बातम्यांबद्दल सेटलमेंटच करत नाहीत त्यांच्याबद्दल तर बोलणे अवघडच आहे.
याबद्दल एक विषय सांगला जातो कि, एक आई आपल्या बालकाला घेवून गुरूजीकडे गेली आणि गुरूजीला सांगितले हा दररोज जास्त प्रमाणात गुळ खातो तुम्ही याला समजून सांगा. गुरूजींनी त्या आईला सांगितले की आठ दिवसानंतर या. त्याप्रमाणे ती आई आठ दिवसांनी आपल्या लेकराला घेवून गुरूजीकडे गेली. तेंव्हा गुरूजीने त्या लेकराला सांगितले की, बेटा जास्त गुळ खाणे शरिराला अपायकारक असते. तेंव्हा तु गुळ आज नंतर खाऊ नको. आईला मोठे आश्चर्य वाटले. एवढेच सांगायचे होते तर आठ दिवसांपुर्वी का सांगितले नाही. या संदर्भाने आईने हाच प्रश्न गुरूजींना विचारला. तेंव्हा गुरूजी म्हणाले ताई आठ दिवसांपुर्वीपर्यंत मी सुध्दा दररोज खुप गुळ खात होतो. मागील आठ दिवसांत मी गुळ खाणे सोडले आहे आणि म्हणूनच मी आज या बालकाला गुळ खाणे सोड असे म्हणण्याचा अधिकारी आहे. या शब्दांचा भावार्थ असा आहे की, जे काम आपण करतो ते काम इतरांना करू नका असे सांगण्याचा आम्हाला अधिकार नसतो.
पण सध्या च्या परिस्थितीत नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल आल्यानंतर पत्रकार/ गुत्तेदार हे सुध्दा मोठ्या त्रासात आहेत. आता आपल्याला कामे मिळतील की नाही त्यात मोठा धंदा करता येईल की नाही या परेशानीत आहेत. हम पत्रकार बंदुक की नहीं कलम की मार रखते है.. हम इरादो मे दम और सोच में गोली की रफ्तार रखते है.. म्हणूनच आमचे जेष्ठ पत्रकार अनिकेत काका कुलकर्णी सांगतात पत्रकारितेतून कमावण्याचा बांधला मी चंग आहे,वृत्तपत्र असो की पुस्तक पैशांची नाते अभंग आहे.
जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांचे सेटलमेंट करण्यात पत्रकार आघाडीवर