नांदेड,(प्रतिनिधी)-सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना नेमणूक केल्याबद्दल सिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष हरजिंदर सिंघ धामी यांनी तिव्र आक्षेप घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल पाठवला आहे.यासोबत पंजाब भागात अनेक विविध संस्था अभिजीत राऊत यांच्या प्रशासक पदावर आक्षेप घेत आहेत.
गुरुद्वारा बोर्डाच्या प्रशासक पदी माजी पोलीस महासंचालक डॉ. पी.एस.पसरीचा यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध बरेच आक्षेप घेण्यात आले. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या.उच्च न्यायालयाने त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यावर प्रतिबंध केला होता. त्यानंतर शासनाने त्यांच्या जागी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राजेंद्र राऊत यांची गुरुद्वारा बोर्ड प्रशासक पदावर नियुक्ती केली.
बिगर सिख व्यक्तीला गुरुद्वारा प्रशासक पदावर नियुक्ती संदर्भाने एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदर सिंघ धामी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल पाठवून आक्षेप घेतला आहे. गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुका झाल्या नाहीत त्या संदर्भात सुद्धा आम्ही खूप वेळेस संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु त्यावरही काही निर्णय झाला नाही.15 मार्च 2022 मध्ये ही निवडणुकांची मुदत संपलेली आहे. तरीपण शासनाने डॉ.पी. एस. पसरीचा यांची नियुक्ती केली. त्यांचाही कार्यकाळ संपला तरी पण अद्याप निवडणुका होत नाहीत असा मजकूर या ईमेलमध्ये लिहिलेला आहे.
एक बिना सिख असलेल्या व्यक्तीची नियुक्ती म्हणजे सिख मर्यादेला कुठेतरी धोका आहे असे शब्द नमूद केले आहे. कोड ऑफ कंडक्ट शीख धर्माचा नुसार व्हायला हवा पण एक बीन सिख असलेला माणूस जर प्रशासक बनवला गेला आहे. तर कोड ऑफ कंडक्टची परिस्थिती अत्यंत गंभीर होणार आहे. म्हणून गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात असे या निवेदनात लिहिले आहे. 6 ऑगस्ट 2023 रोजी केलेल्या या पोस्टवर 9770 लोकांनी त्याला पाहिले आहे, 91 लोकांनी त्यावर रिपोर्ट केले आहे, 5 लोकांनी त्यावर टिपणी केली आहे, 208 लोकांनी त्यावर लाईक केले, आहे आणि 5 लोकांनी या पोस्टला बुक मार्क केले आहे.
हरजिंदर सिंघ धामीसह इतरही अनेक जणांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतलेला आहे.त्यांच्या मते कोणी नॉनसिख व्यक्ती गुरुद्वारा बोर्डाचा प्रशासक होऊ शकत नाही, कारण त्याला शिखमर्यादाच माहीत नाहीत तर मग तो त्या मर्यादे देत कसा काम करेल.