नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील अर्धापूर, हिमायतनगर, मुदखेड सिडको या भागातील जबरी चोरी प्रकरणातील हिमायतनगर आणि मुदखेड या दोन प्रकरणातील चार आरोापींना ताब्यात घेवून यांच्याकडून 6 लाख 1 हजार रुपये मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
हिमायतनगर तालुक्यातील अंधेगाव, दरे सरसम, भुरकाडी या गावातून भारत फायनान्स या कंपनीचे पैसे वसुल करून येत असतांना दरेसरसम ते आंधेगाव या गावाच्या मधात मोटारसायकलवर दोन अज्ञात आरोपी येवून जवळील पैशांची बॅग हिसकावून घेवून पसार झाले होते. दि.4 ऑगस्ट रोजी हिमायतनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलीसांनी पथक तयार करून या आरोपींचा शोध घेतला असता आंधेगाव येथील निखील दत्तात्रय साळुंके (21) आणि ज्ञानेश्र्वर तुकाराम अंनगुलवार (29) हे सकाळपासून गावात नसल्याची माहिती मिळाली. यांचे मोबाईल नंबर प्र्राप्त करून लोकेशन काढले असता तेलंगणा राज्यातील म्हैसा येथे असल्याचे माहिती मिळाली. मात्र ते म्हैसा सोडून भोकरकडे येत होते. आरोपी भोकरकडे येत असल्याची माहिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी सोनारी गावाजवळ सापळा रचून दोन्ही ताब्यात घेतले. व त्यांना विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचा कबुल केला व त्यांच्याकडून मोबाईल, गुन्ह्यातील मोटारसायकल, गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण 1 लाख 63 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मुदखेड तालुक्यातील इजळी या गावाजवळील 5 लाख व सोने अशी जबरी चोरी केल्याची घटना दि.5 ऑगस्ट रोजी घडली होती. इतवारा पोलीसांनी पथक तयार करून यातील दोन आरोपींना 24 तासाच्या आत ताब्यात घेतले. त्यांच्याकडूनही 4 लाख 38 हजार आणि 80 हजार रुपयांचे सोने असा मुद्देमाल जप्त केला. एकंदरीत जिल्ह्यातील या दोन्ही घटनेतील आरोपींना पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे सिडको परिसरातील सोन्याच्या दुकानातील झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपींनाही लवकरच ताब्यात घेवू अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.
पोलीसांच्या वतीने नागरीकांना वेळोवेळी सुचना दिल्या जातात. मात्र त्या सुचनेचे पालन होत नसल्याने अशा घटना घडत ाहेत. नागरीकांजवळ मोठी रक्कम असल्यानंतर त्या नागरीकांनी जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. जेणे करून आम्हाला संरक्षण देता येईल व अशा घटनेपासून होणारी गुन्हेगारी रोखता येईल. सध्या तामिळनाडू अणि केरळ या राज्यातील काही गुन्हेगारी टोळी सर्कीय झाली आहे. ते एक ते दोन महिने एकाच जागी थांबत असतात आणि नंतर तेथून पलायन करतात. यामुळे सध्या अंतर राज्य टोळी जिल्ह्यात सक्रीय झाली असून याबाबत आम्ही त्या राज्यातील पोलीस विभागाशी संपर्क साधत आहोत. लवकरच अशा टोळीच्या मुस्क्या आवळण्यात येतील असेही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, इतवाराचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
मुदखेड चोरी प्रकरणातील आरोपी 24 तासाच्या आत पोलीसांच्या ताब्यात