नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील स्वामी समर्थ मंदिरासमोरच्या रस्त्यावर तीन चोरट्यांनी एका महिलेची पर्स हिसकावून नेली आहे. त्यात 55 हजार रुपयांचा ऐवज होता. मौजे बेरळी ता.मुखेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 21 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. नायगाव-नरसी रस्त्यावर काही दुकाने फोडून चोरट्यांनी 32 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरला आहे. देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुचाकी चोरीला गेली आहे.
वैशाली अरुण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता त्या मगनपुरा भागातील श्री स्वामी समर्थ मंदिरात आपल्या वडीलांसोबत दर्शनासाठी पायी गेल्या असतांना त्यांच्या पाठीमागून एका दुचाकीवर 3 जण आले आणि त्यांच्या गळ्यातील मनीमंगळसुत्र, सोन्याचे गंठण, मोबाईल असलेली पर्स बळजबरीने हिसकावून पळून गेले. त्यामध्ये एकूण 55 हजार रुपयांचा ऐवज होता. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक रोडे अधिक तपास करीत आहेत.
शेख रब्बानी शेख हुसेन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आलुवडगाव ता.नायगाव येथे नरसी ते मुखेड रस्त्यावर त्यांचे आणि साक्षीदारांचे दुकान फोडून चोरट्यांनी एकूण 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नायगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शेख अधिक तपास करीत आहेत.
बळीराम गणपती गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बेरळी ता.मुखेड गावातील त्यांचे घर 6-7 ऑगस्टच्या रात्री फोडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 1 लाख 30 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक फड अधिक तपास करीत आहेत.
देगलूर शहरातील गोकुळनगर भागातून साईनाथ शंकरराव कुरपलवार यांची एम.एच.26 बी.आर.6778 क्रमांकाची दुचाकी गाडी, 35 हजार रुपये किंमतीची कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेली आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार तलवारे हे करीत आहेत.
जबरी चोरी; दोन घरफोड्या; एक दुचाकी चोरी