सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी बुधवारी पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) – सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी बुधवार 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 2 या कालावधीत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र, पहिला माळा शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नामाकिंत कंपन्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

या मेळाव्यात खाजगी सीए फर्मसाठी 5 रिक्त पदासाठी, जस्ट डायल लिमिटेड कंपनी साठी 100 रिक्त जागासाठी तर पिपल ट्री व्हॅचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत  100 रिक्त पदासाठी भरती करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ईमेल nandedrojgar@gmail.com, वर किंवा कार्यालयाचा संपर्क क्रमांक 02462-251674 किंवा योगेश यडपलवार 9860725448 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्रच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *