नांदेड(प्रतिनिधी)-बन्नाळीकर यांचे बोगस हॉस्पीटलची मान्यता रद्द करून फौजदारी कार्यवाही करावी असा अर्ज नांदेडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना गौतम जैन यांनी दिला आहे. हे सर्व प्रकरण त्यांच्या मुलीच्या उपचारासाठी घडले आहे.
गौतम जैन यांच्या पत्नीने 28 जुलै रोजी एका मुलीला जन्म दिला. पत्नीला साखर आजार असल्याने मुलीची एकदा तपासणी करण्यासाठी त्यांना सुचना करण्यात आली. तेंव्हा बन्नाळीकर हॉस्पीटलच्या डॉक्टरांना तेथे बोलावण्यात आले. त्यांच्या मुलीचे वजन 3.50 किलो आहे. तिला आयसीयुमध्ये ठेवण्याची भिती दाखवली.
यावर गौतम जैन यांनी कोणती तपासणी न करता मुलीला श्वास घेण्यास त्रास आहे असे डॉक्टरांना कसे समजले असा प्रश्न उपस्थित केला. कोणतेही बाळ जन्मल्यावर दोन तासात त्या बाळाच्या हृदयस्पंदनाची तपासणी होते. मग मुलीला त्यावेळी सर्व काही ठिक होते. मग बन्नाळीकर हॉस्पीटला कसे समजले की, मुलीला श्वास घेण्यास त्रास आहे. आयसीयुची गरज त्यांना कशी वाटली. मला येथे ऍडमिट करायचे नाही असे मी सांगितल्यावर सर्व कागदपत्र फाडून फेकून दिले. कोणतीही तपासणी न करता 1 हजार रुपये फिस कोणत्या नियमाप्रमाणे घेतली. मी जेंव्हा हॉस्पीटलमध्ये होता तेंव्हा दुसरे एक बाळ रडत होते. मात्र त्या बाळाकडे बघायला कोणीही तयार नव्हते. याचीही तपासणी करावी. जे औषध बाळाला दिले आहे ते बरोबर आहे काय याचीही तपासणी करावी. शासनाच्या नियमावलीप्रमाणे हॉस्पीटलमध्ये पुर्ण पात्रता आहेत काय याचीही तपासणी व्हावी. फिस घेतली परंतू पावती दिलेली नाही याचीही चौकशी करावी.
आपल्या निवेदनातसोबत मेडीकलचे पैसे फोनपेवर दिले आणि सर्व तपासणीचे कागदपत्र सोबत जोडले आहेत. सीसीटीव्ही फुटेज जप्त करावे. सदरची चौकशी फेसबुक लाईव्हवर करावी असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गौतम जैन यांचा अर्ज त्वरीत चौकशीसाठी पाठवला आहे. यासाठी गौतम जैन यांनी व्हाटसऍप गु्रपवर जिल्हाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.
बोगस बन्नाळीकर हॉस्पीटलची मान्यता रद्द करा; गौतम जैन यांची मागणी