नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा लंगर साहिब येथे दरवर्षी 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बरसी कार्यक्रमात पुर्वीचे संत बाबा निधानसिंघजी यांच्याबद्दल अवास्तव आणि वैज्ञानिक दृष्टीकोणाच्या विरुध्द बोलणाऱ्या संत बाबा नरिंदरसिंघजी यांच्याबाबत संगत (जनतेने) श्री पंचप्यारे साहिबान यांना अर्ज दिला असून या अवास्तव बोलण्याबाबत सर्व संगतला या शब्दांबद्दल समजून सांगावे अशी विनंती केली आहे.
यंदाच्या 4 ऑगस्ट रोजी संत बाबा निधानसिंघजी यांची बरसी होती. तेंंव्हा बाबा नरिंदरसिंघजी आणि ग्यानी सुखविंदरसिंघजी यांनी बोलतांना संत बाबा निधानसिंघजी यांनी नांदेडमध्ये घागर सेवा केली आहे. तसेच बाबा निधानसिंघजी यांनी गोदावरी नदीचे पाणी आणून त्या पाण्याला तुप बनवले आहे असे सांगितले आहे. संगतने अशीही विचारणा केली आहे की, बाबा निधानसिंघजी यांना 108 आणि 111 रॅंक कोण्या जत्थेदारांनी दिली आहे अशी रॅंक देण्याचा अधिकार कोणाला आहे. गुरुद्वारा लंगर साहिबचा ईतिहास आणि संत बाबा निधानसिंघजीद्वारा करण्यात आलेल्या चमत्काराबद्दल या वर्षाच्या अगोदर कधीच ऐकण्यात आलेले नाही. त्याचाही खुलासा व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
संगतमधील अनेक युवकांनी श्री.पंचप्यारे साहिबांना प्रत्यक्ष भेटून ही मागणी त्यांच्या समक्ष उपस्थित केली आहे. यावर खुलासा मागविण्याचे आश्र्वासन पंचप्यारे साहिबांनी संगतला दिले आहे.
