नांदेड(प्रतिनिधी)-समाजात ढासळत चाललेल्या संस्कृतीच्या परिस्थितीला वजिराबाद पोलीसांनी काल एका लॉजमध्ये काही युवतींना ताब्यात घेवून छोटासा सुधारणात्मक विचार दाखवला. अत्यंत उत्कृष्ट कार्यवाही करण्यात आली. पण ती दररोजच होणार काय? तसेच या भागात असलेल्या इतर लॉजमध्ये सुध्दा असेच सर्व कार्यक्रम चालतात याची जाणीव असतांना त्यांच्यावर कधी कार्यवाही होणार हाही प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वात दुर्देवी बाब काही असेल तर ज्या लॉजवर वजिराबाद पोलीसांनी काल कार्यवाही केली ती लॉज चालवणारा व्यक्ती सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी सांगितली आहे.
समाजात वेगवेगळ्या कारणांनी युवक-युवतींची पाऊले आपोआप चुकीच्या मार्गांकडे वळतात त्यांच्यावर योग्य नियंत्रण नसल्यामुळे हे घडते आहे. किंबहुना त्यांना गरज आहे म्हणून ते असे करत आहेत. पण समाजात सुध्दा कोल्हे जगतात आणि या कोल्ह्यांना अशाच संधीची गरज असते. म्हणून कोल्हे आलेल्या संधीचे सोने करतात आणि युवक-युवतींकडून चुकीचे काम करून घेतात. याचा ईतिहास पाहायचा असेल तर काही पालकांना वाटते आमची युवती नांदेडमध्ये शिकत आहे. पण तेथे ती कोणते शिक्षण घेत आहे याची माहिती त्यांना नाही. ती वेगळ्याच मार्गाला लागली आहे. कारण तिला आवश्यक असलेले अर्थ सहाय्य मिळत नसेल म्हणून चुकीच्या मार्गांचा अवलंब होत असेल. खरे तर समाजाने या परिस्थितीला पुर्णपणे समजुन घेण्याची गरज आहे. फक्त काही फोटो काढून आम्ही हे केले दाखविण्यापेक्षा या युवतींना आपल्याला काय सहाय्य देता येईल याची गरज शोधली पाहिजे आणि त्यावर काम केले पाहिजे.
सर्वसामान्यपणे असे मानले जाते की, पोलीसांना माहिती असल्याशिवाय त्यांच्या भागात कोणताही चुकीचा कारभार करणे शक्य नाही. पण आपण थोड्यावेळाकरता किंवा चर्चेकरता हे माणून घेऊ की काही बाबी पोलीसांना माहित नसतील. तरीपण काल वजिराबाद पोलीसांनी डॉक्टर्सलेनमध्ये एका लॉजमध्ये प्रवेश केला आणि तेथून आठ ते नऊ युवतींना सोबत आणले. या सर्व युवती तेथे काय करत होत्या. हे लिहिण्याची गरज आम्हाला नाही कारण ते समाजाला समजतेच पण वजिराबाद पोलीसांनी त्या युवतींना आणून त्यांच्या घरी पाठवून दिले. त्यांना घरी पाठविण्याअगोदर त्या युवतींचे मोबाईल नंबर कोणी घेतले नसतील तर नक्कीच खुप छान काम केले. पण याच डॉक्टर्स लेन भागात इतर लॉजेसमध्ये सुध्दा असेच धंदे चालतात. त्या लॉजेस सुध्दा वजिराबाद पोलीसांच्या हद्दीतच आहेत. त्यांच्यावरही कार्यवाही व्हावी तर आम्ही पुन्हा एकदा वजिराबाद पोलीसांचे कौतुक करणारच आहोत.
वजिराबाद पोलीसांनी एका लॉजमधून आणलेल्या आठ ते नऊ युवती म्हणजे समाजासाठी केलेले उत्कृष्ट काम