नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पुर्ण होण्याच्या पार्श्र्वभूमीवर संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. त्याच अनुषंगाने 9 ऑगस्ट रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात पंचप्रण शपथ घेण्यात आली.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयातील अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ घेतली. या शपथेचे वाचन डॉ.अश्र्विनी जगताप यांनी केले.
यावेळी पोलीस कल्याणचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, पोलीस निरिक्षक सुनिल निकाळजे, पोलीस निरिक्षक शामसुंदर टाक, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे तसेच आरसीपी, स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, विनोद भंडारे, महिला पोलीस अंमलदार शामका पवार यांनी केले होते.
पोलीस अधिक्षक कार्यालयात पंचप्रण शपथ