नांदेड(प्रतिनिधी)-सर्वांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलीसाचेच घर चोरट्यांनी फोडल्यामुळे यांच्याच सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण होते आहे.श्रीनगर भागातील स्नेहनगर भागातील पोलीस वसाहतीत एका पोलीसाच्या घरात चोरट्यांनी चोरून करून 53 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि.7 ऑगस्ट रोजी घडली आह याबाबत भाग्यनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध चार पोलीस ठाणे अंतर्गत चार गुन्ह्यात घरफोडून 3 लाख 45 हजार 900 रुपयांची चोरी झाल्याच्या घटना पोलीस दप्तरी नोंद झाल्या आहेत. यामध्ये उस्मानगनर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मारतळा येथील धोंडीबा शंकर येडे यांच्या घराचे लोखंडी चॅनेलगेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटातील 1 लाख 78 हजार 400 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 8 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. याबाबत उस्माननगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचबरोबर भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री दोन चोऱ्या झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. यात श्रीनगर भागातील सहयोग चेंबर्स येथील स.अजितसिंघ जीवनसिंघ मुन्शी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरातील कुटूंबिय हैद्राबाद येथे गेले होते. ते वापस आल्यानंतर घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडल्याचे लक्षात आले व कपाटातील 74 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर स.अजितसिंघ मुन्शी यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द तक्रार दिली आहे.
याचबरोबर शिवाजीनगर हद्दीतील अंकुर हॉस्पीटल येथून हिरोहोन्डा कंपनीची सेप्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम.एच.38 यु.386 या क्रमांकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 5 ऑगस्ट रोजी घडली होती. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंगाराम भुजाजी जोगदंड (32) रा.राजापूर ता.वसमत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. एकंदरीत या चारही घटनेत 3 लाख 45 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास असल्याच्या नोंदी पोलीस दप्तरी आहेत.
चोरट्यांनी फोडले पोलीसाचे घर; विविध तीन चोऱ्या