राष्ट्रीय नृत्य व संगीत स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे नांदेड येथे आयोजन
नांदेडकरांना मिळणार सांस्कृतिक मेजवानी डॉ. सान्वी जेठवाणी
नांदेड (प्रतिनिधी)-नांदेडच सांस्कृतिक वैभव असणारं सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन येत्या दिनांक 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान कुसुम सभागृह येथे करण्यात आल्याची माहिती सप्तरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सान्वी जेठवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरात होत असलेल्या सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवात देश विदेशातील विविध स्पर्धक, नामावंत कलावंत सहभागी होणार आहेत यामध्ये भारतातील वेगवेगळे शास्त्रीय नृत्य, विविध प्रांतातील लोकनृत्य, विविध संगीत शैलीचे सादरीकरण दोन मंचावर होणार आहेत. भरगच्च असा असलेला कार्यक्रम सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत स्पर्धा व साडेपाच पासून महोत्सवाला सुरुवात होणार आहे यामध्ये विशेष निमंत्रित कलावंत आपली कला सादर करणार असून नांदेड येथील लय स्कूलचे विद्यार्थी विशेष प्रस्तुती या मंचावर देणार आहेत.
सदरील वर्ष आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत माझी माती माझा देश त्याचबरोबर मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव या दोन्हीचे औचित्य साधून विविध उपक्रम आणि कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे यामध्ये विशेष करून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा या माध्यमाने मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत आणि येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावा या हेतूने आयोजित केले आहे. विशेष म्हणजे यावर्षी दररोज विविध लावणीचे सादरीकरण देखील होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता रंगमंच क्रमांक एक वर होणार आहे यामध्ये नांदेड क्षेत्रातील विविध मंडळी उपस्थित राहणार आहेत. 16 तारखेला विशेष मतदाता जागृती विषयक विशेष सत्र ठेवण्यात आलं आहे यामध्ये युवक, तृतीयपंथी यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन आयोजित केले आहे यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड येथील विविध सनदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमाने नांदेड येथील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना विशेष सत्कार मूर्ती म्हणून आमंत्रित करून त्यांचे सत्कार करण्यात येत आहे. त्यामध्ये लोककला जीवन पुरस्कार श्री दिलीप खंडेराया यांना जाहीर झाला असून आरोग्य भूषण डॉ. हार्दिप सिंग, संगीत भूषण श्री संजय जोशी, सिंधू भूषण श्री प्रेम शेरवानी, भजन उपासक म्हणून सालासर भजन मंडळ, संस्कृती संवर्धन पुरस्कार राम जन्मोत्सव समिती, युवा समाजसेवा मध्ये कार्यरत असलेले मेमन कम्युनिटी ट्रस्ट या सर्वांना विशेष सत्कार म्हणून पुरस्कार मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे कर्तुत्वान महिलांचा सन्मान करत असताना या वर्षी या शृंखलेत आणखीन एक नावाचा पुरस्कार जाहीर झाला आहे त्यामध्ये स्वर्गीय भावना जेठवानी महिला भूषण पुरस्कार सावित्रीबाई पुजरोड यांना तर स्वर्गीय गीता जेठवाणी महिला भूषण पुरस्कार सुरेखा धामणकर यांना जाहीर झाला आहे.
यावर्षीपासून सानवी जेठवाणी यांच्या संकल्पनेतून किन्नर अस्मिता पुरस्कार देण्याची सुरुवात करण्यात आली आहे तृतीयपंथी कल्याणकारी मंडळ सदस्य असल्यामुळे त्यांच्या समस्या व या क्षेत्रात त्यांच्या कार्याचा मान व्हाव या हेतूने या पुरस्काराचे सुरुवात केल्याचं त्यांनी प्रतिपादन पत्रकार परिषदेत केलं यावर्षी त्यांनी किन्नर अस्मिता पुरस्कारासाठी किन्नर ek ट्रस्ट मुंबई यांचे अध्यक्ष सलमा खान, मुंबई येथील जैन पटेल, सखी चारचौघी मंच संचालिका श्री गौरी सावंत, लेखिका दिशा पिंकी शेख, महामंडलेश्वर मयुरी आळवेकर, तृतीयपंथी कार्यकर्ता शमीबा पाटील, किन्नर बहुउद्देशीय संस्था नागपूरची राणी ढवळे, तृतीया फाउंडेशन पुणे ची संचालिका कादंबरी, कमल फाउंडेशन नांदेडचे अमरदीप गोधने व नांदेड येथील किन्नर च्या गुरु अहमद हुसेन बकस या सर्वांचं विशेष कार्य म्हणून किन्नर अस्मिता पुरस्काराने सन्मानित होणार आहेत. यावेळेस मुख्य उपस्थिती म्हणून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री श्रीकांत देशपांडे यांची उपस्थिती राहणार आहे व त्यांचा मार्गदर्शन मतदान वाढवण्यासाठी व तृतीय पंथांच्या समस्यांसाठी होणार आहे.
स्पर्धेसाठी जवळपास 500 स्पर्धक येणार असून विविध गुरु पण येणार आहेत तीन दिवसीय राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत व कलाप्रकारात महोत्सवात जवळपास साडेतीनशे कलाप्रकार सादर होणार आहेत भव्य असं स्वरूप या महोत्सवाला देण्यात आलं असून त्यासोबत एक विशेष कार्यक्रम शुभम बिरकुरे यांनी दिग्दर्शित केलेलं धर्मो रक्षतिरक्षितः 16 तारखेला विशेष सादरीकरणाने मंचावर प्रस्तुत होणार आहे. सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमाने नांदेडकरांना विशेष परवणी मिळणार आहे व याच संधीच लाभ घेऊन सर्व नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव श्री अक्षय कदम व कार्यकारणी सदस्य सुरेश जोंधळे शुभम मिरकुरे नईम खान, जितेंद्र नरवाल, गणेश चांदोळकर, एड. गजानन पिंपरखेडे, डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, श्री राजीव जैन, कविता जोशी यांनी केले आहे