‘मेरी माटी मेरा देश’ अभियानातर्गत प्राथमिक आरोग्यकेंद्रातील आयुर्वेदिक वनस्पती उद्यानाचे उद्घाटन
नांदेड (जिमाका):- हिमायतनगर तालुक्यातील सरसम व किनवट तालुक्यातील इस्लापूर या प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानातर्गंत त्यांच्या हस्ते आयुर्वेदिक वनस्पती उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता, प्रसुतीचे प्रमाण, मीयावाकी डेन्सफॉरेस्ट पाहणी व आरोग्य विषयक कार्यक्रमांचा आढावा जिल्हा परिषदेच्यामुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी घेऊन समाधान व्यक्त केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी विविध आयुर्वेदिक औषधी वनस्पती व गर्भवती मातांचा पोषक आहार याबाबत सविस्तर माहिती दिली.
मांडवी येथील आदिवासी सांस्कृतिक सभागृहात अभिजित राऊत व जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते आयुष गार्डनचा शुभारंभ करण्यात करण्यात आला. यावेळी सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी, डॉ. शिवशक्ती पवार, डॉ. संदेश जाधव, डॉ.सत्यनारायण मुरेमुरे, किनवटचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पवार, किनवटचे गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव तसेच तालुक्यातील कर्मचारी उपस्थित होते.