नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील सचखंड श्री हजुर साहिब गुरुद्वारा बोर्डच्या प्रशासक पदावरून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना काढून वरिष्ठ आयएएस अधिकारी डॉ. विजय सतबिरसिंघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नांदेड गुरूद्वारा बोर्डाच्या प्रशासक पदावर शासनाने नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नियुक्ती केली. त्यानंतर अनेक शिख संघटन, संत शिख संतमंडळी, अनेक शिख नेते यांनी त्यास विरोध केला. शिख मर्यादेप्रमाणे (कोड ऑफ कंडक्ट) प्रमाणे बोर्डाचे काम चालू शकणार नाही म्हणून गैर शिख व्यक्तीला या प्रशासनाचा कार्यभार देण्यात येवू नये अशी मागणी जोर धरत होती. सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले नेते सिरसा यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे आणि त्यानंतर नांदेड येथील गुरुद्वारा बोर्ड प्रशासक पदावर अभिजित राऊत यांना काढून त्यांच्या जागी वरिष्ठ आयएएस अधिकारी विजय सतबिरसिंघ यांना नियुक्त करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी सांगितली आहे.
डॉ. विजय सतबिरसिंघ यांच्याकडे 15 फेुबु्रवारी 2014 ते 16 मार्च 2015 दरम्यान गुरूद्वारा बोर्ड अध्यक्ष पदाचा कार्यभार देण्यात आला होता. आपल्या प्रशासकीय सेवेचे सुरूवात करतांना विजय सतबिरसिंघ यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सुध्दा काम केलेले आहे.
गुरूद्वारा बोर्ड प्रशासक पदावर आता वरिष्ठ आयएएस अधिकारी डॉ.विजय सतबिरसिंघ