नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात गुन्हेगारांवर आळा बसावा या दृष्टीकोणातून काल रात्री राबविण्यात आलेल्या कोबींग ऑपरेशन दरम्यान पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात पाीेलीस उपअधिक्षक सुरज गुरव, सुशिलकुमार नायक, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार, आरसीपीचे अंमलदार यांनी बऱ्याच गुन्हेगारांना तपासले, अनेकांवर केसेस केल्या.
10 ऑगस्ट रोजी रोजी रात्री 11 पासून ते 11 ऑगस्टच्या पहाटे 4 वाजेदरम्यान शहरातील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावले होते. या नाकाबंदी दरम्यान 85 जणांचे मनुष्यबळ वापरण्यात आले. त्यात 254 वाजन तपासून त्यापैकी 23 वाहनांवर 17 हजार 500 रुपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. 106 गुन्हेगारांना चेक केले. त्यातील 38 जणांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या सध्याच्या हालचाली विषय आणि इतर गुन्हाच्या संदर्भाने चौकशी करण्यात आली. कलम 110/117- महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या 31 केसस करण्यात आल्या. कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे 4 केसेस करण्यात आल्या. भारतीय हत्यार कायद्यानुसार 2 केसेस करण्यात आल्या. चैनस्नेचिंग करणारा एक आरोपी पकडला. जामीन पात्र आणि अजामीन पात्र असे 6 वॉरंट तामील करण्यात आले.
भाग्यनगर पोलीस ठाण्याने दहा अभिलेखावरील गुन्हेगारांना तपासले. 9 जणांना पोलीस ठाण्यात आणून कलम 110/117 प्रमाणे दोन केसस केल्या. पोलीस ठाणे विमानतळणे अभिलेखावरील 22 गुन्हेगार तपासले. त्यापैकी 6 जणांना पोलीस ठाण्यात आणून 110/117 च्या तीन केसेस केल्या. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 12 गुन्हेगार तपासले. त्यापैकी 7 जणांना पोलीस ठाण्यात आणून 110/117 प्रमाणे एकूण 17 केसेस केल्या. वजिराबाद पोलीस ठाण्याने 26 आरोपी तपासले 12 जणांना चौकशीकरीता पोलीस ठाण्यात आणले व 7 जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 प्रमाणे 7 केसेस केल्या आणि कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे 2 केसेस केल्या. भारतीय हत्यार कायद्याचा एक गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने दाखल केला .नांदेड ग्रामीण पोलीसांनी 11 आरोपी तपासले त्यापैकी 4 जणांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. 110/117 ची एक केस केली आणि 122 प्रमाणे एक केस दाखल केली. तसेच भारतीय हत्यार कायद्यानुसार एक गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने दाखल केला.
