सेवानिवृत्तांनो जास्त दिवस जगण्यासाठी शासनाने सेवानिवृत्ती वेतनात वाढ केली आहे

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सेवानिृेवत्त झालेल्या लोकांना त्यांचे जीवन जास्तीत जास्त लांब मिळावे अशी शुभकामना देतांना वयाच्या 80 वर्षानंतर त्यांना मिळणाऱ्या सेवानिवृत्ती वेतनात वाढ केली आहे.
सहाव्या वेतन आयोगाच्या निश्चित झालेल्या मुळ वेतनात कुटूंब निवृत्ती वेतनात 1 एप्रिल 2014 पासून दहा टक्के वाढ करण्यात आली. त्या संदर्भाने शासनाने 1 जानेवारी 2019 पासून नवीन सुधारीत निवृत्ती वेतन वाढ केली आहे. यामध्ये सेवानिवृत्त व्यक्तीचे वय 80 ते 85 असेल तर त्यांच्या मुळ निवृत्ती वेतनात 10 टक्के वाढ होणार आहे. सेवानिवृत्त व्यक्तीचे वय 85 ते 90 असे असेल तर त्यांच्या मुळ निवृत्ती वेतनात 15 टक्के वाढ होणार आहे. या पुढे वय वाढले आणि ते 90 ते 95 दरम्यान असेल तर त्या व्यक्तीच्या मुळ सेवानिवृत्ती वेतनात 20 टक्के वाढ होणार आहे. यापुढे वय 95 ते 100 असेल तर त्यांच्या मुळ सेवानिवृत्ती वेतनात 25 टक्के वाढ होणार आहे. सेवानिवृत्त व्यक्तीचे वय 100 पेक्षा जास्त झाले तर त्यांच्या मुळ निवृत्ती वेतनात 50 टक्के वाढ होणार आहे. या संदर्भाने सातव्या वेतन आयोगातील सर्व उदाहरणे जोडली आहेत. या शासन परिपत्रकावर वित्त विभागाचे उप सचिव इंद्रजित गोरे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *