नांदेड ग्रामीण पोलीसांनी देशी दारु पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 144 देशी दारुच्या बाटल्या पकडून एका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरिक्षक गोविंद बालाजीराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 ऑगस्ट रोजी ते स्वत: पोलीस अंमलदार वानखेडे आणि जाधव हे असर्जनघाटकडे जात असतांना एम.एच.26 बी.झेड.8442 यादुचाकी गाडीवर तीन प्लॅस्टीकच्या पिशव्यांमध्ये काही तरी संशयीत वस्तु आहे म्हणून थांबवले. विचारणा केली असता त्याचे नाव अजय नागोराव डोंगरे (32) रा.काळेगल्ली वसरणी असे होते. त्याच्याकडील पिशव्यांमध्ये तपासणी केली असता 180 एमएलच्या देशी दारु भिंगरी संत्र्याच्या 144 बॉटल्या मिळाल्या. प्रत्येक बाटलीची किंमत 70 रुपये प्रमाणे हा ऐवज 10 हजार 80 रुपयांचा होतो. हा प्रकार सकाळी 7.30 वाजता घडला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी अजय नागोराव डोंगरेविरुध्द दारु बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक जगदीश भंंडरवार यांनी दारु पकडणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *