नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डाचे नवीन प्रशासक वरिष्ठ आयएएस अधिकारी डॉ.विजय सतबिरसिंघ यांनी आज सर्व प्रथम सचखंड श्री हजुर साहिबजी यांचे दर्शन घेवून गुरूद्वारा बोर्डाच्या प्रशासक पदाचा पदभार स्विकारला.
काही दिवसांपुर्वी सिख नसलेले जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्याकडे गुरूद्वारा बोर्डाचा प्रशासक पदाचा पदभार दिल्या आदेश शासनाने जारी केला होता. त्यांच्याअगोदर माजी पोलीस महासंचालक डॉ.पी.एस.पसरीचा यांच्याकडे गुरूद्वारा प्रशासक पदाचा पदभार होता. त्यांच्याविरुध्द अनेक याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या. त्यामध्ये न्यायालयाने त्यांना धोरणात्मक निर्णय न घेण्याचे आदेश दिले होते. पण ते आदेश धाब्यावर ठेवून पसरीचा यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. त्याच्या परिणामात त्यांचा प्रशासक पदाचा पदभार काढून नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे गुरुद्वारा बोर्डाच्या प्रशासक पदाचा कार्यभार देण्यात आला. त्यांच्याविरुध्द सुध्दा काही सिख संघटनांनी आणि काही सिख नेत्यांनी आक्षेप घेतला. की, एक सिख नसलेला माणुस सिख मर्यादा (कोड ऑफ कंडक) याप्रमाणे कसा काम करेल. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ आयएएस सिख अधिकारी डॉ.विजयसतबिर सिंघ यांची नियुक्ती प्रशासक पदावर केली.
आज दि.13 ऑगस्ट रोजी विजय सतबिरसिंघ हे नांदेडला आले आणि सायंकाळी सचखंड श्री हजुर साहिबजी यांचे दर्शन सर्वप्रथम घेतले. तेथे गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर त्यांनी गुरूद्वारा बोर्डाच्या प्रशासक पदाचा पदभार स्विकारला आहे.
डॉ.विजय सतबिरसिंघ यांनी गुरूद्वारा बोर्डाच्या प्रशासक पदाचा पदभार आज स्विकारला